शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डोपिंग प्रकरणामुळे खेळाडूंसोबत देशही त्रस्त होतो: किरेन रिजिजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 06:08 IST

अभिनेता सुनील शेट्टी ‘नाडा’चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

नवी दिल्ली : ‘भारतात डोपिंगचे प्रकार आमच्या चिंतेत भर पाडणारे असून, यामुळे खेळाडूसोबत देशाचीही प्रतिमा मलीन होते. भारतात पारदर्शी क्रीडा संस्कृती रुजविण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजिजू यांनी मंगळवारी केले.

भारतीय खेळाडू विदेशात डोपिंगमध्ये अडकल्यास देशाची नाचक्की होत असल्याचे सांगून क्रीडामंत्री म्हणाले, ‘भारताला पारदर्शी क्रीडा राष्ट्र बनविण्यासाठी डोपिंगमध्ये सामील लोकांना शोधण्याची गरज आहे. दुसरीकडे अजाणतेपणे यात अडकणाऱ्यांना डोपिंगचे दुष्परिणाम समजावून सांगण्याची वेळ आली आहे. डोपिंगची सर्वच प्रकरणे हेतुपुरस्पर केली जातात, असे मी म्हणणार नाही. मात्र काही खेळाडू हेतुपुरस्परपणे हे काम करतात. काही खेळाडू असेही आहेत जे नकळतपणे ड्रग्ज सेवन करतात. यासाठी स्वच्छ खेळाची प्रसिद्धी होण्याची गरज आहे. जे बेसावधपणे डोपिंगच्या आहारी जातात, त्यांची चूक सुधारण्याचे काम सूज्ञ नागरिकांना करावे लागेल.’

अभिनेता सुनील शेट्टी याला राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीचा (नाडा) ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडर बनविण्याची घोषणा केल्यानंतर रिजिजु यांनी डोपिंगच्या दुष्परिणामापासून खेळाडूंना सावध केले. टोकियो आॅलिम्पिकला केवळ आठ महिने शिल्लक असून, यंदा देशातमोठ्या प्रमाणावर डोपिंगची प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. रिजिजू पुढे म्हणाले,‘आमचे खेळाडू विदेशात डोपिंगमध्ये दोषी आढळावेत, असे मला अपेक्षित नाही. यामुळे देशाची प्रतिमा मलीन होते. खेळाडूंची आणि त्यांच्या कुटुंबीयांची प्रतीमा मलिन होते.’ यंदा १५० हून अधिक खेळाडू देशात डोपिंगमध्ये दोषी आढळले. त्यात सर्वाधिक शरीरसौष्ठवपटू आहेत.

‘देशात पारदर्शी आणि स्वच्छ क्रीडा संस्कृतीचा विकास करावा लागेल. खेळात असे प्रकार क्लेशदायी ठरतात. भारताला क्रीडा महाशक्ती बनायचे असेल तर खेळाडूंनी डोपिंगसारख्या प्रकारापासून दूर राहायला हवे. पारदर्शी खेळ ही काळाची गरज आहे,’ असेही रिजिजू यांनी यावेळी सांगितले.

यशाचा कुठलाही ‘शॉर्टकट’ नाही

‘यशासाठी कुठलाही शॉर्टकट असूच शकत नाही. चारित्र्याची निर्मिती हळुवारपणे होते. मी ही मोहीम शालेयस्तरावर राबविण्यास इच्छुक आहे. खेळात यश मिळवायचे असेल तर प्रामाणिक मार्गाने जाण्याचा संदेश मुलांना द्यायचा आहे. भारत हा प्रामाणिक देश आहे, असा संदेशही याद्वारे द्यावा लागेल. आमचे अनेक प्रशिक्षक मुलांना वास्तविकतेची माहिती देण्याइतके प्रशिक्षित नाहीत, असे माझे प्रामाणिक मत आहे.’ - सुनील शेट्टी, अभिनेता

टॅग्स :Sunil Shettyसुनील शेट्टीIndiaभारत