डोप टेस्टमध्ये फेल, शॉट पुटरचे पदक परत घेतले

By Admin | Updated: August 21, 2016 20:33 IST2016-08-21T20:33:44+5:302016-08-21T20:33:44+5:30

रशियाचा शॉट पुटर येवजिनिया कोलादको डोप चाचणीत अयशस्वी ठरल्याने त्याचे पदक परत घेण्यात आले

Dop failed to take the shot, shot shot | डोप टेस्टमध्ये फेल, शॉट पुटरचे पदक परत घेतले

डोप टेस्टमध्ये फेल, शॉट पुटरचे पदक परत घेतले

ऑनलाइन लोकमत
रियो डि जेनेरिओ, दि. 21 -  २०१२ लंडन आॅलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता रशियाचा शॉट पुटर येवजिनिया कोलादको डोप चाचणीत अयशस्वी ठरल्याने त्याचे पदक परत घेण्यात आले आहे़ आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) याची माहिती दिली आहे़ आयओसीने सांगितले की, कोलादकोच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या़ त्यामध्ये त्याने प्रतिबंधित पदार्थ सेवनात दोषी आढळून आला आहे़ समितीने रशियाच्या आॅलिम्पिक समितीला आदेश दिले आहेत की त्याच्याकडील पदक लवकरात लवकर परत घ्यावेत़ यापूर्वी रशियाचा चार बाय ४०० मी़ महिला रिले संघाकडूनही डोप टेस्टमध्ये फेल ठरल्यानंतर त्यांचे सुवर्णपदक परत घेण्यात आले होते़ रशियाच्या संघाने हे पदक बीजिंग आॅलिम्पिकमध्ये जिंकले होते़

Web Title: Dop failed to take the shot, shot shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.