्रपुण्याचे वर्चस्व
By Admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:23+5:302014-10-03T22:56:23+5:30
सोलापूर :

्रपुण्याचे वर्चस्व
स लापूर : सुयश गुरुकुल शिक्षण संकुलात झालेल्या पुणे विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत पुणे शहर संघाने चारही गटात आपले वर्चस्व राखले़ १७ व १९ वर्षे वयोगटात पुणे शहर संघाने विजय नोंदवला़१७ वर्षे वयोगटात मुलांमध्ये पुणे शहर संघ दस्तूर हायस्कूल तर मुलींमध्ये के़ बजाज संघाने विजय मिळवला़ १९ वर्षे वयोगटात पुणे शहर संघ फर्ग्युसन कॉलेजने अनुक्रमे मुला-मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले़विजयी संघांना सुयश चषक प्रदान करण्यात आला़ यावेळी क्रीडाधिकारी जुबेर शेख, श्रीधर गायकवाड, नितीन खांडेकर, प्रबुद्ध चिंचोलीकर, कस्तुरे, पाटील, जुनेद वळसंगकर आदी उपस्थित होते़ विजयी संघाचे संस्था सचिव केशव शिंदे, मुख्याध्यापिका विद्या शिंदे, क्रीडाशिक्षक राहुल हजारे आदींनी कौतुक केले़फोटोओळी-पुणे विभागीय बास्केटबॉल स्पर्धेतील विजेत्या १९ वर्षांखालील फर्ग्युसन कॉलेज पुण्याच्या विजयी संघासोबत नितीन खांडेकर, जुबेर शेख, केशव शिंदे, डॉ़ पुरणचंद्र पुंजाल, राजा पटेल, राहुल हजारे, कस्तुरे, श्रीधर गायकवाड, प्रबुद्ध चिंचोलीकऱ