विरोधकांना आपली कमजोरी कळू देऊ नका, सचिनने उलगडलं यशाचं रहस्य
By Admin | Updated: October 7, 2016 19:00 IST2016-10-07T19:00:19+5:302016-10-07T19:00:19+5:30
आपल्या विरोधकांना आपली कमजोरी कधीच कळून देऊ नका असा सल्ला देत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपल्या यशाचं रहस्य सांगितलं आहे

विरोधकांना आपली कमजोरी कळू देऊ नका, सचिनने उलगडलं यशाचं रहस्य
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - आपल्या विरोधकांना आपली कमजोरी कधीच कळून देऊ नका असा सल्ला देत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपल्या यशाचं रहस्य सांगितलं आहे. तब्बल दोन दशक सचिन तेंडूलकरने क्रिकेटवर वर्चस्व गाजवलं. अनेक भारतीय क्रिकेटर्सनी जेव्हा खेळायला सुरुवातही केली नव्हती तेव्हापासासून सचिन क्रिकेट खेळत आहेत. अनेकांचा तो आदर्श आहे.
‘एकदा एक जोरदार चेंडू माझ्या बरगड्यांवर आदळला. मी ते दुखणं कसंतरी सहन केलं. पण त्यावेळी मी गोलंदाजाला मला त्याची जाणीवही होऊ दिली नाही. जर मी तसं केलं असतं तर तो अधिक आक्रमक झाला असता. तीन महिन्यानंतर मला स्कॅनिंगनंतर समजलं की, माझ्या एका बरगडीला दुखापत झाली आहे', अशी आठवण सचिनने यावेळी सांगितली.
‘मी विरोधकांना कधीच जाणवू दिलं नाही की, मी थकलो आहे. कधीच हार मानली नाही. जर तुम्ही तुमच्या विरोधकांना तुमची कमजोरी कळू दिली तर ते त्याचा नक्कीच फायदा उठवतील', असंही सचिनने सांगितलं आहे.