क्रिकेटच्या हितासाठी आयपीएल नको- बॉथम
By Admin | Updated: September 4, 2014 16:01 IST2014-09-04T15:57:08+5:302014-09-04T16:01:33+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या हितासाठी इंडियन प्रिमिअर लीगसारखी (आयपीएल) टूर्नामेंट नसायला पाहिजे असे परखड मत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान बॉथम यांनी मांडले आहे.

क्रिकेटच्या हितासाठी आयपीएल नको- बॉथम
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ४ - आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या हितासाठी इंडियन प्रिमिअर लीगसारखी (आयपीएल) टूर्नामेंट नसायला पाहिजे असे परखड मत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान बॉथम यांनी मांडले आहे. आयपीएलमुळे जागतिक क्रिकेटमधील प्राथमिकता बदलली असून खेळाडू संघमालकांचे गुलाम बनत आहेत असे बॉथम यांनी म्हटले आहे.
लॉर्ड्स येथे एमसीसीतर्फे आयोजित व्याख्यानात इयान बॉथम यांनी आयपीएलवर जोरदार टीका केली. बॉथम म्हणाले, आयपीएलमध्ये वर्षातील दोन महिने जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू विकत घेतले जातात व या खेळाडूंना पुढे आणणा-या क्रिकेट बोर्डाला काहीच आर्थिक मोबदला दिला जात नाही. आयपीएल हे क्रिकेटमधील नवे पर्व असले तरी अद्याप ते अस्थिरच आहे. आयपीएल हे शक्तीशाली बनत असल्याने क्रिकेटच्या दिर्घकालीन हितासाठी हे धोकादायक ठरु शकते असे बॉथम यांनी सांगितले. आयपीएलमुळे बुकी आणि फिक्सिंग करणा-यांना आणखी वाव मिळतोय असा आरोपही बॉथम यांनी केला.