कसोटी आयोजनाची परवानगी देऊ नका; कीर्ती आझाद कोर्टात

By Admin | Updated: November 18, 2015 04:02 IST2015-11-18T04:02:33+5:302015-11-18T04:02:33+5:30

फिरोजशाह कोटलावर भारत-द. आफ्रिका संघादरम्यान चौथा कसोटी सामना आयोजित करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे दरभंगा येथील

Do not allow test planning; In Kirti Azad court | कसोटी आयोजनाची परवानगी देऊ नका; कीर्ती आझाद कोर्टात

कसोटी आयोजनाची परवानगी देऊ नका; कीर्ती आझाद कोर्टात

नवी दिल्ली : फिरोजशाह कोटलावर भारत-द. आफ्रिका संघादरम्यान चौथा कसोटी सामना आयोजित करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे दरभंगा येथील खासदार कीर्ती आझाद यांनी दिल्ली हायकोर्टात केली.
न्या. बदर अहमद आणि न्या. संजीव सचदेवा यांच्या पीठापुढे डीडीसीएने कसोटी आयोजनासाठी दक्षिण दिल्ली महापालिकेकडून अस्थायी प्रमाणपत्र मिळण्याचे आदेश देणारी विनंती याचिका दाखल केली आहे. महापालिकेने डीडीसीएचा अर्ज फेटाळला होता. यावर मंगळवारी सुनावणीदरम्यान आझाद यांनी ही मागणी पुढे केली. सामन्याचे आयोजन ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत होणार असून, डीडीसीएने महापालिकेला १ ते १० डिसेंबर या कालावधीसाठी अस्थायी ताबा प्रमाणपत्र (पीओसी) मागितले आहे. दरम्यान, आझाद यांनी डीडीसीएत आर्थिक अफरातफरी होत असून, सीबीआय व कंपनी रजिस्ट्रारकडून चौकशी सुरू असल्याचा आरोपदेखील केला. क्रिकेट संचालनासाठी वर्षाला ४० कोटी मिळतात, पण केवळ सात कोटींचा खर्च केला जातो, असेही आझाद म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Do not allow test planning; In Kirti Azad court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.