जोकोविचचा अँडी मरेला धक्का

By Admin | Updated: September 5, 2014 02:09 IST2014-09-05T02:09:52+5:302014-09-05T02:09:52+5:30

नोव्हाक जोकोविचने आपले विजयी अभियान कायम राखताना यूएस ओपन टेनिस स्पर्धेत 2क्12चा चॅम्पियन ब्रिटनच्या अँडी मरेला धूळ चारून थाटात उपांत्य फेरी गाठली़

Djokovic's Andy Murray Push | जोकोविचचा अँडी मरेला धक्का

जोकोविचचा अँडी मरेला धक्का

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आपले विजयी अभियान कायम राखताना यूएस ओपन टेनिस स्पर्धेत 2क्12चा चॅम्पियन ब्रिटनच्या अँडी मरेला धूळ चारून थाटात उपांत्य फेरी गाठली़ जपानच्या केई निशिकोई आणि अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स यांनीही अंतिम चार खेळाडूंत जागा निश्चित केली आह़े 
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अनुभवी नोव्हाक जोकोविचने ब्रिटनच्या आठवे मानांकनप्राप्त अँडी मरेला 7-6, 6-7, 6-2, 6-4 अशा गुणफरकाने घरचा रस्ता दाखविताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला़ उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोविचला जपानच्या निशिकोरीचा सामना करावा लागणार आह़े
पुरुष गटातील दुस:या उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या निशिकोरीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना तृतीय मानांकित व ऑस्ट्रेलिया ओपन चॅम्पियन स्वित्ङरलडच्या स्टेनिसलास वावरिंकावर 5 सेटर्पयत रंगलेल्या लढतीत 3-6, 7-5, 7-6, 6-7 आणि 6-4 अशा फरकाने मात करीत स्पर्धेत आगेकूच केली़ दुसरीकडे महिला गटातील एकेरी लढतीत अव्वल मानांकनप्राप्त अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने 11वे मानांकनप्राप्त इटलीच्या फ्लाविया पेनेटाचे आव्हान 6-3, 6-2 असे मोडून काढत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला़ महिला गटातील अन्य उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या एकातेरिना माकारोव्हाने बेलारुसच्या 17वे मानांकनप्राप्त व्हिक्टोरिया अजारेंकाचा 87 मिनिटांत 6-4, 6-3 असा फडशा पाडत 
अंतिम  4 खेळाडूंत स्थान निश्चित केल़े (वृत्तसंस्था)

 

Web Title: Djokovic's Andy Murray Push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.