फेडररच्या माघारीने जोकोविचला विजेतेपद

By Admin | Updated: November 18, 2014 00:55 IST2014-11-18T00:55:22+5:302014-11-18T00:55:22+5:30

स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने पाठीच्या दुखापतीमुळे एटीपी टूर फायनल्समधून माघार घेतल्यामुळे जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू सर्बियाचा नोव्हाक जोकोविचला विजेता घोषित करण्यात आले़

Djokovic wins Federer's title | फेडररच्या माघारीने जोकोविचला विजेतेपद

फेडररच्या माघारीने जोकोविचला विजेतेपद

लंडन : स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने पाठीच्या दुखापतीमुळे एटीपी टूर फायनल्समधून माघार घेतल्यामुळे जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू सर्बियाचा नोव्हाक जोकोविचला विजेता घोषित करण्यात आले़
जोकोविच आणि फेडरर हे खेळाडू स्पर्धेच्या फायनलमध्ये अजिंक्यपदासाठी एकमेकांशी झुंजणार होते; मात्र स्पर्धेच्या एक दिवस आधी आपल्याच देशाच्या स्टेनिसलास वावरिका याच्यावर मात करणाऱ्या ३३ वर्षीय फेडररने १७ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत फायनलमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले़
त्यामुळे जोकोविच कोणतेही परिश्रम न घेता स्पर्धेचा विजेता ठरला आहे़ विशेष म्हणजे हे स्पर्धेतील त्याचे सलग तिसरे जेतेपद ठरले़ दरम्यान, दुखापतीमुळे एटीपी टूर फायनल्समधून माघार घेणारा फेडरर आता डेव्हिस चषकाच्या फायनलमध्ये खेळणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे़ (वृत्तसंस्था)

Web Title: Djokovic wins Federer's title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.