जोकोविच विजय

By Admin | Updated: March 31, 2015 23:30 IST2015-03-31T23:30:49+5:302015-03-31T23:30:49+5:30

माजी विजेत्या नोवाक जोकाविचने बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिसचा ६-०, ७-५ ने पराभव करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

Djokovic victory | जोकोविच विजय

जोकोविच विजय

नवी दिल्ली : माजी विजेत्या नोवाक जोकाविचने बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिसचा ६-०, ७-५ ने पराभव करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याच्यासोबतच जपानच्या केई निशीकोरी, कॅनडाच्या मिलोस रॉनिक आणि अमेरिकेच्या जॉन इस्नेर यांनी अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान पक्के केले आहे.
सर्बियाचा अव्वल खेळाडू असलेल्या जोकोविचने गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. या वर्र्षी स्पर्धेत त्याचा पाचवा विजय आहे. सामन्यात त्याने पूर्ण वर्चस्व राखले. पहिला सेट त्याने अवघ्या २६ मिनिटांत जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये डार्सिसने थोडा संघर्ष केला. मात्र, सामन्यात जोकोविचने बाजी मारली. विजयानंतर तो म्हणाला, योग्य क्षणाला पुनगरामन केल्याचा आनंद आहे. स्टीव्हमध्ये विविध फटके खेळण्याची कला आहे.

Web Title: Djokovic victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.