जोकोविच तिसर्यांदा विम्बल्डनच्या फायनलमध्ये
By Admin | Updated: July 4, 2014 22:42 IST2014-07-04T22:42:44+5:302014-07-04T22:42:44+5:30
उपांत्य फेरी : दिमित्रोव्हवर विजय

जोकोविच तिसर्यांदा विम्बल्डनच्या फायनलमध्ये
उ ांत्य फेरी : दिमित्रोव्हवर विजयलंडन : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने ग्रिगोव दिमित्रोव्हचा ६-४, ३-६, ७-६, ७-६ असा पराभव करीत तिसर्यांदा फायनलमध्ये धडक मारली.त्याआधी २०११ मध्ये विम्बल्डनचा चॅम्पियन जोकोविच सवार्ेत्तम फॉर्ममध्ये नव्हता; परंतु त्याने जबरदस्त झुंजार खेळ करताना बल्गेरियाच्या ११ व्या मानांकित प्रतिस्पर्ध्याला ३ तास २ मिनिटे रंगलेल्या लढतीत पराभूत केले.सहा वेळेसचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन जोकोविचचा सामना सात वेळेसचा विम्बल्डन चॅम्पियन रॉजर फेडर अथवा कॅनडाच्या आठव्या मानांकित मिलोस राओनिच याच्याशी होईल. जोकोविच १४ व्यांदा ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पोहोचला आहे. त्याने गत फायनलमध्ये अँडी मरेला पराभूत केले होते.जोकोविचने विजेतेपद जिंकल्यास तो सप्टेंबर २०१३ नंतर प्रथमच राफेल नदालकडून नंबर एकचा ताज हिसकावून घेईल.पहिल्या सेटमध्ये जोकोविचने दिमित्रोव्हच्या खराब सर्व्हिसवर आघाडी घेतली. त्याने दुसर्या सेटमध्ये २-१ अशी आघाडी घेतली; परंतु बॅकहँडवर खराब खेळामुळे त्याने सहाव्या गेममध्ये दिमित्रोव्हला मुसंडी मारण्याची संधी दिली.दिमित्रोव्हने काही चांगले विनर लगावले आणि जोकोविचची सर्व्हिस भेदताना ५-३ अशी आघाडी घेतली. तणाव आणि अनेक चुकांदरम्यान जोकोविचने तिसरा सेट टायब्रेकरमध्ये जिंकला. चौथ्या सेटमध्ये तिसर्या गेममध्ये दिमित्रोव्हने दोनदा दुहेरी चुका केल्या. त्यामुळे जोकोविचने २-१ अशी आघाडी घेतली. पुढील गेममध्ये जोकोविचची सर्व्हिस भेदली गेली. त्यामुळे दिमित्रोव्हला पुन्हा मुसंडी मारण्याची संधी मिळाली.त्यानंतर जोकोविचने तीन ब्रेक पॉइंट वाचवताना स्कोर ३-३ असा केला. दिमित्रोव्ह ही लढत टायब्रेकरपर्यंत घेऊन गेला आणि त्याने ६-३ अशी आघाडी घेतली. नंतर मात्र जोकोविचने तीन सेट पॉइंट वाचवताना विजयावर शिक्कामोर्तब केले.जोकोविचने म्हटले, मी सुरुवात चांगली केली होती; परंतु नंतर त्याला मुसंडी मारण्याची संधी दिली. सामना कठीण होता आणि चौथा सेट कोणत्याही दिशेला जाऊ शकत होता; परंतु फायनलमध्ये पोहोचल्याने मी आनंदी आहे. ही लढत पाहण्यासाठी दिमित्रोव्हची गर्लफ्रेंड मारिया शारापोव्हादेखील प्लेअर्स बॉक्समध्ये उपस्थित होती.