जोकोविच टेनिसचा बादशाह
By Admin | Updated: October 7, 2015 03:04 IST2015-10-07T03:04:29+5:302015-10-07T03:04:29+5:30
जागतिक क्रमवारीत सर्बियाचा नोवाक जोकोविच याने अव्वल स्थान कायम राखले असून, सलग १६७ आठवडे अग्रस्थानी राहण्याचा पराक्रम देखील त्याने केला आहे. अमेरिकेचा महान टेनिसपटू

जोकोविच टेनिसचा बादशाह
लंडन : जागतिक क्रमवारीत सर्बियाचा नोवाक जोकोविच याने अव्वल स्थान कायम राखले असून, सलग १६७ आठवडे अग्रस्थानी राहण्याचा पराक्रम देखील त्याने केला आहे. अमेरिकेचा महान टेनिसपटू जॉन मॅक्नरी याच्या १७० आठवडे अव्वल राहण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून केवळ तो तीन पावले मागे आहे. महिलांमध्ये सेरेना विल्यम्स प्रथम स्थानी आहे.
जोकोविच याने यंदाचे तीनही ग्रॅण्डस्लॅम जिंकत आपली घोडदौड सुरुच ठेवली आहे. सर्बियाच्या २८ वर्षीय जोकोविच याचे १५ हजार ६४५ अंक झाले आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याचे ९२४० गुण आहेत. ब्रिटनचा अॅण्डी मरे तिसऱ्या, स्वित्झर्लडचा के स्टेनिसलाल वारिन्का ६००५ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. चेक गणराज्यचा टॉमस बर्डीच ४९०० गुणांसह पाचव्या, जपानचा के केई निशिकोरी सहाव्या, स्पेनचा डेव्हिड फेरर सातव्या व स्पेनचा राफेल नदाल आठव्या स्थानी आहे. महिलांच्या डब्लूटीए मानांकमात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स ११२८५ गुण मिळवून पहिल्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)