जोकोविच-फेडरर अंतिम लढत

By Admin | Updated: August 23, 2015 23:42 IST2015-08-23T23:42:31+5:302015-08-23T23:42:31+5:30

जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर यांच्या एटीपी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस

Djokovic-Federer final fight | जोकोविच-फेडरर अंतिम लढत

जोकोविच-फेडरर अंतिम लढत

सिनसिनाटी : जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर यांच्या एटीपी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष गटाच्या विजेतेपदाची लढत होईल. महिला गटात अमेरिकेची सेरेना विलियम्स आणि रोमानियाची सिमोना होलेप या अंतिम लढतीत खेळतील.
पुरुष एकेरीत जोकोविचने उपांत्य फेरीत युक्रेनच्या अ‍ॅलेक्झांड्रा डोलगोपोलोव्हाला ४-६, ७-६, ६-२ असे नमविले. दुसरीकडे फेडररने गत आठवड्यात मॉँट्रियल मास्टर्सचे विजेतेपद जिंकणारा अ‍ॅँडी मरेला सरळ दोन सेटमध्ये ६-४, ७-६ असे नमवीत अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली.
महिलांच्या उपांत्य फेरीत सेरेनाने उक्रेनच्या इलिना स्वितोलिनाला ६-४, ६-३; तर रोमानियाच्या होलेपने सर्बियाच्या येलेना यांकोविचला ६-१, ६-२ असे पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Djokovic-Federer final fight