जोकोविचचा पराभव

By Admin | Updated: December 9, 2014 01:32 IST2014-12-09T01:32:00+5:302014-12-09T01:32:00+5:30

ग्रँडस्लॅमचा बादशाह रॉजर फेडरर याने आपला सर्वोत्तम खेळ करताना आंतरराष्ट्रीय प्रीमिअर टेनिस लीग (आयपीटीएल) स्पध्रेत भारतीय संघाकडून खेळताना सलग तीन विजयांची नोंद केली;

Djokovic defeats | जोकोविचचा पराभव

जोकोविचचा पराभव

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅमचा बादशाह रॉजर फेडरर याने आपला सर्वोत्तम खेळ करताना आंतरराष्ट्रीय प्रीमिअर टेनिस लीग (आयपीटीएल) स्पध्रेत भारतीय संघाकडून खेळताना सलग तीन विजयांची नोंद केली; परंतु सर्बियाच्या नोवाक जोकोविच याला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. 
‘आयपीटीएल’च्या दिल्लीतील चरणात फेडररने एकेरीसह सानिया मिङरसह मिo्र दुहेरी आणि रोहन बोपन्नासह पुरुष दुहेरीत विजय मिळविला. जोकोविच युएई रॉयल्स संघाकडून खेळत असून, रविवारी पुरुष दुहेरीत जोकोविच आणि नेनाद जिमोनजिच या जोडीला विल्फ्रेड त्सोंगा आणि डॅनिएल नेस्टरकडून टायब्रेकरमध्ये रंगलेल्या समान्यात 5-6 असा पराभव पत्करावा लागला. जोकोविचच्या संघाला मनिला मेवरिक्स संघाकडून 24-27 असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यातील लिजंड एकेरीत मनिलाच्या मार्क फिलिपोसिसने युएई रॉयल्सच्या गोरान इवानिसेविचला 6-3 असे नमविले. पुरुष एकेरीत युएस ओपन चॅम्पियन मारिन सिलिच याने मनिलाच्या त्सोंगाचा 6-5 असा पराभव केला. मिo्र दुहेरीत मनिलाच्या नेस्टर व कस्टर्न फ्लिपकेन्स या जोडीने जिमोनजिच व क्रिस्टिना म्लादेनोविच जोडीचा 6-2 असा पराभव केला. महिला एकेरीत रॉयल्सच्या कैरोलिन वोज्नियाकीने याने फ्लिपकेन्सचा 6-3 असा पराभव केला असला तरी अंतिम गुणांमध्ये मनिलाने 27-24 अशी बाजी मारली. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Djokovic defeats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.