पदकविजेत्यांचा ‘दिव्यांग खेलरत्न’ने गौरव
By Admin | Updated: September 18, 2016 05:56 IST2016-09-18T05:36:59+5:302016-09-18T05:56:27+5:30
देशाची मान उंचावणाऱ्या चार खेळाडूंना राज्य शासनाच्या वतीने ‘दिव्यांग खेलरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे

पदकविजेत्यांचा ‘दिव्यांग खेलरत्न’ने गौरव
मुंबई : ब्राझीलमधील रिओ-डी जानेरो येथे नुकत्याच झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदके मिळवून देऊन देशाची मान उंचावणाऱ्या चार खेळाडूंना राज्य शासनाच्या वतीने ‘दिव्यांग खेलरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, तसेच प्रत्येकी पाच लाख रुपये रोख देण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी येथे केले.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बडोले म्हणाले, ‘‘मुंबईत लवकरच एक सोहळा आयोजित करून भालाफेकमधील सुवर्णपदकविजेता देवेंद्र झझारिया, उंच उडीतील सुवर्णपदकविजेता मरियप्पन थंगवेलू, गोळाफेकमधील रौप्यपदकविजेती दीपा मलिक व उंच उडीतील कांस्यपदकविजेता खेळाडू वरुणसिंह भाटी या चौघांना गौरविण्यात येईल.’’
(विशेष प्रतिनिधी)