डिव्हिलियर्स-विराटचे झिंग.. झिंग... झिंगाट

By Admin | Updated: May 15, 2016 04:38 IST2016-05-15T04:38:04+5:302016-05-15T04:38:04+5:30

ख्रिस जॉर्डनचा (४-११) अचूक मारा याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने शनिवारी विक्रमांनी गाजलेल्या लढतीत गुजरात लायन्सचा १४४ धावांनी एकतर्फी पराभव केला.

Divilier-Virat zing .. zing ... zing | डिव्हिलियर्स-विराटचे झिंग.. झिंग... झिंगाट

डिव्हिलियर्स-विराटचे झिंग.. झिंग... झिंगाट

बंगळुरू : कर्णधार विराट कोहली (१०९) आणि एबी डिव्हिलियर्स (नाबाद १२९) यांच्या वैयक्तिक शतकी खेळीनंतर ख्रिस जॉर्डनचा (४-११) अचूक मारा याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने शनिवारी विक्रमांनी गाजलेल्या लढतीत गुजरात लायन्सचा १४४ धावांनी एकतर्फी पराभव केला.
संघासाठी महत्त्वाच्या असलेल्या लढतीत बँगलोरने निर्धारित २० षटकांत ३ बाद २४८ धावांची दमदार मजल मारली. स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर यजमान संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करताना प्रतिस्पर्धी गुजरात संघाचा डाव १८.४ षटकांत १०४ धावांत गुंडाळला. गुजराततर्फे अ‍ॅरोन फिंचने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. बँगलोरतर्फे जॉर्डनने ११ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले, तर युजवेंद्र चहलने १९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले.
त्याआधी, विराट व डिव्हिलियर्स या जोडीने १६ षटकांत दुसऱ्या विकेटसाठी २२९ धावांची द्विशतकी भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासात ही कुठल्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. ख्रिस गेल (६) स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार विराटने ५५ चेंडूंना सामोरे जाताना १०९ धावांची खेळी केली. त्यात पाच चौकार व ११ षटकारांचा समावेश आहे. दुसऱ्या टोकावरून डिव्हिलियर्सने ५२ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १२९ धावा फटकावल्या. त्यात १० चौकार व १२ षटकारांचा समावेश आहे. त्याने ४३ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. (वृत्तसंस्था)
01 एका टष्ट्वेंटी-२0 सामन्यात दोघांनी शतके करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी अशी घटना २0११ मध्ये झाली होती. केव्हीन ओ’ब्रायन (११९) आणि हाशिम मार्शल (१0२) या दोघांनी ग्लुसेस्टरशायर संघाकडून मिडलसेक्स संघाविरुद्ध दोन शतके झळकावली होती.
05वेळा ए. बी. डिव्हिलियर्सने यंदाच्या आयपीएलमध्ये पन्नाशीचा आकडा पार केला आहे. २00९ मध्ये त्याने चार वेळा पन्नाशी पार केली होती. यापैकी एकदा शतक गाठले.बंगळुरू : भारतीय क्रिकेटचा चेहरा म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या विराट कोहलीने शनिवारी त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्सतर्फे तिसऱ्यांदा शतकी खेळी केली. या चमकदार कामगिरीसह विराटने आयपीएल स्पर्धेत एका मोसमात सर्वाधिक शतके ठोकण्याचा पराक्रम केला.
बँगलोरसंघाचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी त्यांच्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या लढतीत वैयक्तिक शतके ठोकली. आक्रमक फलंदाजी करताना या खेळाडूंनी अनेक विक्रम नोंदवले. ५ बाद २६३ धावांची सर्वोच्च खेळीही याच संघाच्या नावावर आहे
विराटने शनिवारी खेळल्या गेलेल्या लढतीत बँगलोरतर्फे १०९ धावांची खेळी केली. यंदाच्या आयपीएल मोसमात विराटची ही तिसरी शतकी खेळी आहे. विराटने यापूर्वी रायझिंग पुणे सुपरजायन्ट््सविरुद्ध नाबाद १०८ व गुजरातविरुद्ध नाबाद १०० धावांची खेळी केली होती. आयपीएलच्या एका मोसमात ३ शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. या व्यतिरिक्त एकाच डावात २ फलंदाजांनी शतके ठोकण्याचा आयपीएलच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे.संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : ख्रिस गेल त्रि. गो. कुलकर्णी ०६, विराट कोहली झे. ब्राव्हो गो. प्रवीण कुमार १०९, एबी डिव्हिलियर्स नाबाद १२९, शेन वॉटसन झे. कार्तिक गो. प्रवीण कुमार ००. अवांतर (४). एकूण २० षटकांत ३ बाद २४८. गोलंदाजी : प्रवीण कुमार ४-१-४५-२, कुलकर्णी ३-०-३३-१.
गुजरात लायन्स : ड्वेन स्मिथ त्रि. गो. अरविंद ०७, ब्रेन्डन मॅक्युलम झे. डिव्हिलियर्स गो. चहल ११, रवींद्र जडेजा झे. व गो. जॉर्डन २१, दिनेश कार्तिक झे. डिव्हिलियर्स गो. जॉर्डन ०२, अ‍ॅरोन फिंच झे. अरविंद गो. सचिन बेबी ३७, ड्वेन ब्राव्हो पायचित गो. चहल ०१, अक्षदीप नाथ त्रि. गो. चहल ०३, प्रवीण कुमार त्रि. गो. जॉर्डन ०१, धवल कुलकर्णी त्रि. गो. जॉर्डन ०२, प्रवीण तांबे नाबाद ०७, शिविल कौशिक झे. अरविंद गो. सचिन बेबी ००. अवांतर (१२). एकूण १८.४ षटकांत सर्वबाद १०४. गोलंदाजी : अरविंद ३-०-१५-१, चहल ४-०-१९-३, जॉर्डन ३-०-११-४, सचिन बेबी ०.४-०-४-२.

Web Title: Divilier-Virat zing .. zing ... zing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.