जिल्हा क्रीडा पुरस्कार
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:36+5:302015-01-29T23:17:36+5:30
खुरसने, राधा यांचा जिल्हा

जिल्हा क्रीडा पुरस्कार
ख रसने, राधा यांचा जिल्हा क्रीडा पुरस्काराने गौरवनागपूर : मध्यम पल्ल्याचा धावपटू नागराज खुरसने आणि तलवारबाजीतील राष्ट्रीय खेळाडू राधा देशमुख यांच्यासह जलतरण प्रशिक्षक संदीप खोब्रागडे तसेच महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे यांना यंदा जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कस्तूरचंद पार्क येथे झालेल्या सोहळ्यात पुरस्कार प्रदान केले. राष्ट्रीय धावपटू नागराज याने क्रॉसकंट्रीत चमकदार कामगिरी केली असून राधाने विविध राष्ट्रीय सञपर्धेत महाराष्ट्र संघासाठी तलवारबाजीत पदके जिंकली. संदीप खोब्रागडे यांनी जलतरणात खेळाडू तयार केले आहेत. डांगरे यांच्या मार्गदर्शनात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेचे नागपुरात आयोजन झाले होते. रोख दहा हजार, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.(क्रीडा प्रतिनिधी)...............................................................