विंडीज मुद्यावर आज चर्चा
By Admin | Updated: October 21, 2014 02:50 IST2014-10-21T02:50:57+5:302014-10-21T02:50:57+5:30
भविष्यातील विंडीज दौ-यावर बंदी घालायची किंवा कसे यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयच्या कार्यसमितीची उद्या मंगळवारी बैठक होत आहे.

विंडीज मुद्यावर आज चर्चा
हैदराबाद : भविष्यातील विंडीज दौ-यावर बंदी घालायची किंवा कसे यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयच्या कार्यसमितीची उद्या मंगळवारी बैठक होत आहे. याशिवाय विंडीज संघाने भारत दौरा अर्धवट सोडल्याने झालेल्या नुकसानभरपाईचा किती रकमेचा दावा करावा याचाही निर्णय घेण्यात येईल.
कार्यसमितीच्या बैठकीआधी आयपीएल संचालन परिषदेची देखील बैठक होणार असून विंडीजच्या खेळाडूंच्या भविष्यावर चर्चा केली जाईल. विंडीजच्या खेळाडूंनी
त्यांच्या बोर्डासोबत वेतनावरून झालेल्या वादामुळे चौथा वनडे खेळण्यासही नकार दिला होता. त्यांची मनधरणी झाल्यानंतर हा सामना होऊ शकला. दौरा रद्द केल्यामुळे बीसीसीआयपुढे जी समस्या निर्माण झाली त्याबद्दल कठोर संदेश दिला जाईल, असे बोर्डाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याचे मत आहे.
बीसीसीआय अधिकारी भविष्यातील दौऱ्यावर बंदी हवी शिवाय आयपीएलमध्ये कॅरेबियन खेळाडूंना बंदी घालावी या मताचे आहेत. पण काही पदाधिकाऱ्यांचे मत भिन्न आहे.
खेळाडूंची यात चूक नसताना त्यांना शिक्षा का, असा या अधिकाऱ्यांचा सवाल आहे. (वृत्तसंस्था)