शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उत्तर प्रदेशात बसपाच्या ‘पुष्पा’ची चर्चा; ...आज तीच पुष्पा ‘फायर’ बनून भाजप विरोधात मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 12:24 IST

पुष्पा शाही म्हणाल्या, “मायावती यांनी एका महिलेचे दु:ख समजून घेत उमेदवारी दिली. भाजपने मला तिकीट नाकारून अन्याय केला. या वेळी मी विजयी होणार आहे.”

देवरिया : ‘पुष्पा’ चित्रपटातील एक संवाद सध्या खूपच वापरला जात आहे. “पुष्पा जानकर फ्लावर समझा क्या मैं फायर है”. अशाच प्रकारे ज्या पुष्पाला फूल समजून भाजपने उमेदवारी नाकारली आज तीच पुष्पा ‘फायर’ बनून बहुजन समाज पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. देवरिया जिल्ह्यातील रामपूर कारखाना विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंड केलेल्या आणि बसपकडून उमेदवारी मिळवून पुष्पा शाही बड़हरा चौरस्त्यावर आल्या, तेव्हा बसपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

पुष्पा शाही म्हणाल्या, “मायावती यांनी एका महिलेचे दु:ख समजून घेत उमेदवारी दिली. भाजपने मला तिकीट नाकारून अन्याय केला. या वेळी मी विजयी होणार आहे.”पुष्पा शाही यांचे पती गिरजेश ऊर्फ गुड्डू शाही रामपूर कारखाना विधानसभा मतदारसंघ २०१२ मध्ये अस्तित्वात आला तेव्हा अपक्ष लढून ४४ हजार ६८७ मते घेऊन दुसऱ्या स्थानी होते. २०१७ मध्ये पुन्हा ते अपक्ष लढले व ४१ हज़ार ८१४ मते मिळवून तिसऱ्या स्थानी होते. २०१९ मध्ये गिरजेश शाही भाजपमध्ये आले. गिरजेश शाही यांनी आपली पत्नी पुष्पा हिला उमेदवारी मागितली होती. परंतु, यादी जाहीर झाली तेव्हा  सुरेंद्र चौरसिया यांचे नाव होते. नंतर गिरजेश शाही यांनी आपले गाव नौतनमध्ये पाठीराख्यांना एकत्र केले. बसपने त्या मतदारसंघात संदेश उर्फ मिस्टर यादव यांना तिकीट दिले होते. पुष्पा शाही यांनी पराभव न मानता मायावतींकडे तिकिटासाठी प्रयत्न सुरूच ठेवले.  

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाmayawatiमायावती