टेनिस फिक्सरांची नावे उघड करा
By Admin | Updated: January 22, 2016 02:55 IST2016-01-22T02:55:40+5:302016-01-22T02:55:40+5:30
मॅच फिक्सिंग हा प्रकार टेनिस विश्वासाठी धोक्याची घंटा असल्याचे संबोधून यात सामील असलेल्या फिक्सरांची नावे उघड करण्याची मागणी जगभरातील टेनिसपटू व चाहत्यांनी केली आहे.

टेनिस फिक्सरांची नावे उघड करा
मेलबर्न : मॅच फिक्सिंग हा प्रकार टेनिस विश्वासाठी धोक्याची घंटा असल्याचे संबोधून यात सामील असलेल्या फिक्सरांची नावे उघड करण्याची मागणी जगभरातील टेनिसपटू व चाहत्यांनी केली आहे.
१८ वेळा ग्रॅन्डस्लॅम चॅम्पियन राहिलेली दिग्गज खेळाडू मार्टिना नवरातिलोवा म्हणाली, ‘आम्हाला पुराव्यांची माहिती हवी आहे. केवळ अफवा पसरवून चालणार नाही.!’
१७ ग्रॅन्डस्लॅमचा विजेता रॉजर फेडररने नावाचा खुलासा करण्याची मागणी करीत फिक्सिंग करणारी व्यक्ती एकेरी अथवा दुहेरीची खेळाडू आहे काय? याबद्दलचे गुपित उघड व्हावे.’ एका अहवालात टेनिस विश्वात फिक्सिंग होत असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला होता. यात ग्रॅन्डस्लॅम चॅम्पियनसह अनेक खेळाडू गुंतले असल्याचे म्हटले होते.