मुंबईविरुद्धच्या अपयशाने निराश होतो : रहाणे
By Admin | Updated: May 5, 2015 00:47 IST2015-05-05T00:47:33+5:302015-05-05T00:47:33+5:30
दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध शानदार नाबाद ९१ धावांची खेळी करून राजस्थान रॉयल्सला विजयी मार्गावर आणणाऱ्या अजिंक्य रहाणेने याआधीच्या

मुंबईविरुद्धच्या अपयशाने निराश होतो : रहाणे
मुंबई : दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध शानदार नाबाद ९१ धावांची खेळी करून राजस्थान रॉयल्सला विजयी मार्गावर आणणाऱ्या अजिंक्य रहाणेने याआधीच्या सामन्यात अपयशी ठरल्याने दु:खी असल्याचे सांगतानाच याची कसर भरून काढण्याच्या प्रयत्नात होतो, असे स्पष्ट केले.
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात रहाणे केवळ १६ धावा काढून बाद झाला होता. यामुळे निराश झालेल्या रहाणेने दिल्ली विरुद्ध सगळी कसर भरून काढताना शानदार नाबाद ९१ धावा फटकावून संघाला विजयी करतानाच यंदाच्या सत्रात सर्वाधिक ४०० हून अधिक धावा बनवून आॅरेंज कॅपदेखील पटकावली.
रहाणे म्हणाला, की मी चांगली फलंदाजी करीत असल्याची कल्पना होती. मात्र, मुंबई विरुद्ध खराब फटका मारून बाद झालो. यामुळे मी खूप निराश झालो. त्याची भरपाई मला करायची होती, असे सांगतानाच रहाणेने सांगितले, की नायरनेदेखील चांगली खेळी केली.
पहिले पाच सामने जिंकून झोकात सुरुवात केल्यानंतर पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉटसनने सांगितले, की आम्ही स्पर्धेतील विजयी लय गमावलेली; परंतु आता आम्ही पुन्हा एकदा चांगल्या फॉर्ममध्ये आलो आहोत. रहाणे व नायर यांच्यानंतर गोलंदाजांनीदेखील चांगली कामगिरी केली. त्यामुळेच यापुढेदेखील आमच्या कामगिरीत सातत्य राहील, अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)