हरभजन व माझ्यात फरक : अश्विन

By Admin | Updated: August 4, 2015 00:40 IST2015-08-04T00:40:14+5:302015-08-04T00:40:14+5:30

श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात रविचंद्रन अश्विन आणि अनुभवी हरभजनसिंग अशा दोन आॅफस्पिनरचा समावेश आहे, पण अश्विनच्या मते त्याच्यात व हरभजनमध्ये मोठा फरक आहे.

Difference between Harbhajan and me: Ashwin | हरभजन व माझ्यात फरक : अश्विन

हरभजन व माझ्यात फरक : अश्विन

चेन्नई : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात रविचंद्रन अश्विन आणि अनुभवी हरभजनसिंग अशा दोन आॅफस्पिनरचा समावेश आहे, पण अश्विनच्या मते त्याच्यात व हरभजनमध्ये मोठा फरक आहे.
दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकारांनी हरभजनबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अश्विन म्हणाला, ‘‘माझ्या व हरभजनच्या खेळामध्ये मोठा फरक आहे. हरभजनच्या साथीने कसे खेळणार, हे मला स्पष्ट करता येणार नाही. प्रतिस्पर्धी फलंदाजांबाबत रणनीती तयार करता येईल, पण माझा सहकारी कसा खेळेल, हे मला कसे सांगता येईल. हरभजन अनुभवी गोलंदाज असून त्याला आपली भूमिका माहीत आहे. मी व हरभज आॅफस्पिनर असलो तरी आमचा खेळ वेगवेगळा आहे.
आमची शक्तिस्थळे वेगवेगळी असून आम्ही वेगळे आहोत. मी माझी जबाबदारी आपल्या पद्धतीने पार पाडणार आहे.’’
अश्विन म्हणाला, ‘‘या मालिकेदरम्यान निवृत्ती स्वीकारणारा श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकाराला बाद करण्यासाठी प्रयत्नशील आहे. संगकारा महान फलंदाज असून
त्याला बाद करणे महत्त्वाचे आहे. एकदा जर त्याला बाद केले तर त्याला दुसऱ्यांदा बाद करणे सोपे नसते. पण, या मालिकेत त्याला बाद करण्यास उत्सुक आहे.’’
आयपीएलमध्ये सीएसके खेळाडू असलेल्या अश्विनने आपल्या टी-२० संघातील माजी सहकारी व जगातील महान आॅफस्पिनर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनचा सल्ला घेणार असल्याचे म्हटले आहे. लंकाविरुद्धच्या मालिकेचा आम्हाला निश्चितच लाभ होईल. लंकेतील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला मदत करतील. आमचे गोलंदाज आपली भूमिका चोख बजावण्यात यशस्वी ठरतील, अशी आशा आहे.’’(वृत्तसंस्था)

Web Title: Difference between Harbhajan and me: Ashwin