शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने पुन्हा इतिहास रचला! वर्ल्ड लीडसह जिंकली डायमंड लीग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 23:22 IST

भारताचा 'गोल्डन बॉय' ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं ( Neeraj Chopra) ने दोहा येथे झालेल्या डायमंड लीग ( Diamond League) मध्ये भालाफेकीतील जेतेपद कायम राखले.

भारताचा 'गोल्डन बॉय' ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं ( Neeraj Chopra) ने दोहा येथे झालेल्या डायमंड लीग ( Diamond League) मध्ये भालाफेकीतील जेतेपद कायम राखले. पहिल्याच प्रयत्नात फेकलेला ८८.६७ मीटर लांब भाला, त्याला डायमंड लीग जिंकण्यासाठी पुरेसा ठरला. 

गतविजेत्या नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात ८८.६७ मीटर भालाफेक करताना ग्रेनाडाचा पीटर अँडरसन व झेक प्रजासत्ताकचा व्हॅल्देच याकुब या कट्टर स्पर्धकांना मागे ठेवले. दुसऱ्या प्रयत्नात मात्र नीरजचा भाला ८६.०४ मीटर लांब जाऊ शकला, परंतु तो अव्वल स्थानावरच होता.  तिसऱ्या प्रयत्नात नीरजचा भाला आणखी कमी दूर गेला अन् त्याला ८५.४७ मीटर भालाफेक केली.  दुसऱ्या प्रयत्नात याकुब ८८.६३ मीटर भालाफेक करून नीरजच्या जवळ पोहोचला होता. पण, अजूनही नीरज हा वर्ल्ड लीडसह आघाडीवरच होता.  नीरजचा चौथा प्रयत्न फाऊल ठरला आणि पाचव्या प्रयत्नात ८४.३७ मीटर भालाफेक झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सर्व स्पर्धकांना अडचण होत होती. सहाव्या प्रयत्नात नीरजला ८६.५२ मीटर लांब भालाफेकता आला आणि तो या प्रयत्नाने काहीसा निराश दिसला. ९० मीटर लांब भालाफेकीसाठी त्याला आणखी प्रतीक्षा व प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याला टक्कर देणाऱ्या जाकुबला ८४.७६ मीटर भालाफेकता आल्याने नीरजचे जेतेपद निश्चित झाले.

९ सप्टेंबर २०२२ मध्ये नीरजने  इतिहास रचला होता. मानाची डायमंड ट्रॉफी जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. डायमंड लीगमध्ये नीरजनं ८८.४४ मीटर दूरवर भालाफेक करत विजयाची नोंद केली. नीरजने २०२१मध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करत इतिहास रचला होता. त्याआधी २०१८ मधील आशिया स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही नीरजने सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०२२ जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरजने रौप्य पदक मिळवलं होतं.   

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्रा