शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

PR Shrijesh : ४१ वर्षांनी भारताला पदक जिंकून दिलं अन् सत्कारात मिळाले धोतर, शर्ट व १००० रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 11:30 IST

भारतीय संघानं कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा रोमहर्षक विजय मिळवला अन् भारताचा ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला

भारतीय पुरुष हॉकी संघानं १९८०नंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय संघानं कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा रोमहर्षक विजय मिळवला अन् भारताचा ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. भारताच्या या यशात गोलरक्षक पी आर श्रीजेश याचा सिंहाचा वाटा आहे. ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न घेऊन तो टीम इंडियाची सेवा करत होता अन् टोकियोत हे स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे या पदकाचे मोल त्याच्या शिवाय कोणाला सहज समजणे शक्य नाही. ऑलिम्पिकमधील घवघवीत यशानंतर भारतीय खेळाडूंवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे, त्याला हॉकी संघही अपवाद ठरलेला नाही. पण, पी आर श्रीजेशला बक्षीस म्हणून चक्क धोतर, शर्ट अन् १००० रुपये देण्याचा निर्णय झाला आणि चर्चेला विषय मिळाला.. ( A Dhoti and Shirt with a cash prize of Rs 1,000 ; the award for PR Sreejesh that has been announced ) 

ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४, १९८० मध्ये सुवर्णपद,  १९६०मध्ये रौप्य आणि १९६८, १९७२, २०२१मध्ये कांस्य अशी एकूण १२ पदकं नावावर केली आहेत. बीसीसीआयनं पुरुष हॉकी संघाला १.२५ कोटींचं बक्षीस जाहीर केलं. पंजाब सरकारनं संघातील पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी जाहीर केले. असे असताना श्रीजेशला फक्त धोतर, शर्ट व १००० रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णयाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. केरळ सरकारच्या हातमाग विभागानं पी आर श्रीजेशचा असा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

यूएईतील व्यावसायिक डॉ. शमशीर वयालिल यांनी पी आर श्रीजेशला १ कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे.     

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021HockeyहॉकीKeralaकेरळ