आयपीएलमध्ये धोनीचीच "सत्ता", सातव्यांदा खेळणार फायनल
By Admin | Updated: May 20, 2017 16:48 IST2017-05-20T16:48:01+5:302017-05-20T16:48:01+5:30
आयपीएलच्या फक्त 10 सीझनमध्ये सातव्यांदा फायनलमध्ये खेळत धोनी नवा रेकॉर्ड करणार आहे

आयपीएलमध्ये धोनीचीच "सत्ता", सातव्यांदा खेळणार फायनल
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा हुकमी एक्का महेंद्रसिंग धोनी 21 मे रोजी आयपीएल 2017 चा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर त्याच्या नावे एक नवा रेकॉर्ड होणार आहे. धोनी आपली सातवी आयपीएल फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरेल. आयपीएलच्या फक्त 10 सीझनमध्ये सातव्यांदा फायनलमध्ये खेळत धोनी नवा रेकॉर्ड करणार आहे. हा रेकॉर्ड आपल्या नावे करणारा तो पहिला खेळाडू असणार आहे. रविवारी हैदराबादमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्सदरम्यान अंतिम सामना पार पडणार आहे.
यावेळी सर्वात जास्त आयपीएल फायनल खेळण्याचा रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाच्या नावे आहे. दोघांनीही चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना सहा वेळा फायनल खेळली आहे. रविवारी पुणे संघाकडून खेळताना धोनी आपली सातवी फायनल खेळणार आहे. आयपीएलमध्ये सात वेळा अंतिम सामना खेळणारा धोनी पहिलाच खेळाडू ठरेलं. मॉर्केल, एस बद्रीनाथ और रविचंद्रन अश्विन यांनी 5-5 वेळा फायनल खेळली आहे.
याआधी धोनीच्या नेतृत्तवाखाली चेन्नई संघाने 2008, 2010, 2011, 2012, 2013 आणि 2015 मध्ये अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. 2010 आणि 2011 मध्ये त्यांनी आयपीएल चषक जिंकला होता.
चेन्नई सुपरकिंग्जकवर आलेल्या दोन वर्षांच्या बंदीमुळे धोनी आणि रैनाला संघ सोडून अनुक्रमे पुणे आणि गुजरात संघाकडून खेळावं लागलं.
मुंबईचा पराभव करत पुणे संघाने अंतिम सामन्यात आपलं स्थान पक्क केलं. संघाला फायनलमध्ये पोहोचवण्यात धोनीने महत्वाची भूमिका बजावली. अजिंक्य रहाणे (56) आणि मनोज तिवारीने (58) लगावलेल्या अर्धशतकांनंतर धोनीने तुफान फटकेबाजी करत 26 चेंडूत 40 धावा केल्या. पुण्याने मुंबईसमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईचा 20 धावांनी पराभव करत पुण्याने अंतिम सामन्यात धडक मारली.