धोनीमुळे टळला मला वगळण्याचा निर्णय - विराट कोहली

By Admin | Updated: January 7, 2017 15:23 IST2017-01-07T15:12:31+5:302017-01-07T15:23:57+5:30

विराटने 2008 मध्ये श्रीलंके विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.

Dhoni's decision to exclude me: Virat Kohli | धोनीमुळे टळला मला वगळण्याचा निर्णय - विराट कोहली

धोनीमुळे टळला मला वगळण्याचा निर्णय - विराट कोहली

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 7 - भारताचा नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीमुळे संघातील आपले स्थान टिकून राहिल्याची प्रांजळ कबुली दिली आहे. माझी भारतीय संघातून गच्छंती अटळ होती. पण महेंद्रसिंह धोनी ठामपणे पाठिशी उभा राहिल्यामुळे मला माझे संघातील स्थान टिकवता आले असे विराटने सांगितले. 
 
विराटने 2008 मध्ये श्रीलंके विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये एकदिवसीय आणि टेस्टमध्ये कामगिरीत सातत्य नसल्यामुळे संघातील माझे स्थान निश्चित नव्हते. पण धोनीने माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला. 

आणखी वाचा 
 
सुरुवीताच्या दिवसांमध्ये धोनीने मला मार्गदर्शन केले, मला संधी दिली. एक क्रिकेटर म्हणून विकसित होण्यासाठी त्याने मला पुरेसा वेळ दिला. अनेकदा संघाबाहेर होण्यापासून वाचवले असे विराटने सांगितले. विराटने शुक्रवारी टि्वट करुन धोनी तू माझा नेहमीच कर्णधार राहशील अशा शब्दात धोनीच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. 

Web Title: Dhoni's decision to exclude me: Virat Kohli