धोनी आयपीएल संघ विकत घेण्यास इच्छुक
By Admin | Updated: November 10, 2015 23:19 IST2015-11-10T23:19:34+5:302015-11-10T23:19:34+5:30
भारतीय वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) एक फ्रॅ न्चायझी विकत घेण्यास इच्छुक आहे.

धोनी आयपीएल संघ विकत घेण्यास इच्छुक
नवी दिल्ली : भारतीय वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) एक
फ्रॅ न्चायझी विकत घेण्यास इच्छुक आहे.
मीडियातील वृत्तानुसार धोनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) फ्रॅन्चायझी विकत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. बीसीसीआयने एका संघाची बेस प्राईस (मूळ किंमत) ४० कोटी रुपये ठेवली आहे. धोनी व्यतिरिक्त कोलकाताचे उद्योगपती संजीव
गोयंका यांनीही आयपीएल संघ विकत घेण्यास
पसंती दर्शवली आहे. गोयंका इंडियन सुपर लीगची कोलकाता फ्रॅन्चायझी एटलेटिको डी कोलकाताचे सहमालक आहेत.
दरम्यान, बीसीसीआयच्या कार्यकारी समितीने आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातर्फे गठित करण्यात आलेल्या जस्टिस लोढा समितीच्या अहवालानंतर चेन्नई सुपरकिंग्स व राजस्थान रॉयल्स या संघांना आयपीएलमधून निलंबित केले
आहे. या निर्णयानंतर भारतीय कर्णधार धोनीने आयपीएल संघ विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी धोनी आयपीएल स्पर्धेतील चेन्नई सुपरकिंग्स संघाचे नेतृत्व करीत होता. बीसीसीआयने दोन नव्या संघांसाठी नऊ शहरांचा पर्याय ठेवला आहे. त्यात अहमदाबाद, इंदूर, कानपूर यांच्यासह नागपूरचाही समावेश आहे.(वृत्तसंस्था)