पहिल्या कसोटीत धोनी खेळणार?
By Admin | Updated: December 7, 2014 01:18 IST2014-12-07T01:18:09+5:302014-12-07T01:18:09+5:30
महेंद्रसिंग धोनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 डिसेंबरपासून प्रारंभ होणा:या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे.

पहिल्या कसोटीत धोनी खेळणार?
अॅडिलेड : महेंद्रसिंग धोनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 डिसेंबरपासून प्रारंभ होणा:या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. तो पहिल्या कसोटीपूर्वीच संघात दाखल झालेला आहे. हाताला झालेल्या दुखापतीमुळे धोनी पहिला कसोटी सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. निर्धारित कार्यक्रमानुसार 12 डिसेंबरपासून प्रारंभ होणा:या दुस:या कसोटी सामन्यापूर्वी धोनी संघासोबत जुळण्याची शक्यता होती. फिलिप ह्युजच्या मृत्यूमुळे कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे पहिला कसोटी सामना आता 9 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे.
सलामीवीर शिखर धवन म्हणाला, ‘कर्णधारपदासाठी प्रभारी कर्णधार विराट कोहलीला प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण धोनी पहिल्या कसोटी सामन्याला पुरेसा कालवधी शिल्लक असताना येथे पोहोचला आहे.’
आगामी मालिकेबाबत बोलताना शिखर म्हणाला, ‘या मालिकेत मिशेल जॉन्सनचा मारा खेळण्याची प्रतीक्षा आहे. तो जगातील सवरेत्तम गोलंदाजांपैकी एक आहे, पण आम्ही वेगवान मारा खेळण्याचा चांगला सराव केला आहे. आंतरराष्ट्रीय व आयपीएल सामन्यांमध्ये त्याचा मारा खेळण्याचा अनुभव आहे, पण ऑस्ट्रेलियात त्याच्याविरुद्ध प्रथमच खेळणार आहे.’
धवनने 2क्13 मध्ये मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे पदार्पणाची कसोटी खेळली होती. त्यात त्याने वेगवान शतकाचा विक्रम नोंदविला होता. धवनने त्या लढतीत 174 चेंडूंना सामोरे जाताना 187 धावा फटकाविल्या होत्या. त्यानंतर तो भारतीय कसोटी संघाचा नियमित सदस्य झाला, पण विदेशात मात्र त्याला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
धवन म्हणाला, ‘हा दौरा महत्त्वाचा असून आम्ही सर्व चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहोत. ऑस्ट्रेलिया जगातील सवरेत्तम कसोटी संघ असून त्यांच्याविरुद्ध धावा फटकाविण्यास उत्सुक आहोत. आम्ही चांगली तयारी केली असून आव्हान पेलण्यास सज्ज आहोत. (वृत्तसंस्था)