धोनीला बासरी वाजविताना पाहून आश्चर्य वाटले!
By Admin | Updated: October 8, 2015 04:26 IST2015-10-08T04:26:51+5:302015-10-08T04:26:51+5:30
भारतीय क्रिकेट चाहते जगभरात सर्वाधिक उत्साही, भावनिक आणि समर्पित आहेत; पण क्रिकेटमध्ये भावनांवर नियंत्रण राखण्याचीही गरज असते. कटकमध्ये सोमवारी दुसऱ्या टी-२०

धोनीला बासरी वाजविताना पाहून आश्चर्य वाटले!
एबी डीव्हिलियर्स लिहितो...
भारतीय क्रिकेट चाहते जगभरात सर्वाधिक उत्साही, भावनिक आणि समर्पित आहेत; पण क्रिकेटमध्ये भावनांवर नियंत्रण राखण्याचीही गरज असते. कटकमध्ये सोमवारी दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान जो दुर्दैवी प्रसंग पाहिला त्या प्रसंगाला आमच्या खेळात मुळीच स्थान नाही.
प्रेक्षकांनी मैदानावर पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. सीमारेषेवर उभ्या असलेल्या खेळाडूंना टार्गेट करीत या बाटल्या फेकण्यात येत असाव्यात. याच कारणांमुळे पंचांना दोनदा सामना थांबवावा लागला. त्यानंतर सामना संपल्याची पंचांनी घोषणा करताच खेळाडूंनी एकमेकांसोबत हस्तांदोलन सुरू केले. पण दहा मिनिटांंनंतर खेळ पुन्हा सुरू झाला.
आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन ही कटकसाठी मोठी संधी होती. अशा वेळी प्रेक्षकांमधील एक गट भारतीय संघाच्या दारुण कामगिरीवर नाराज झालेला दिसला. पण हा केवळ अंदाज आहे. सत्य असे, की आमच्या गोलंदाजांनी फारच सुरेख मारा केला. यजमान संघाला आम्ही अवघ्या ९२ धावांत गुंडाळले. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांतील खेळपट्ट्यांनी मी चकित झालो. या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना साथ मिळाली. फिरकीपटू मात्र हतबल जाणवले. पुढील सामन्यांत अशा खेळपट्ट्या मिळण्याची शक्यता नाही. तरीही वन डे आणि कसोटी मालिकेतील
संभाव्य कडव्या आव्हानासाठी
आम्ही सज्ज आहोत. कटकमध्ये आम्हाला दुसरा शानदार अनुभवदेखील आला. दोन्ही संघांना एकाच विमानातून कोलकातासाठी प्रवास करायचा होता. आम्ही सर्व जण कटक विमानतळावरील व्हीआयपी कक्षात होतो. तोच बासरीचा आवाज
ऐकून आश्चर्यचकित झालो. बासरीतून मधुर धून ऐकायला
येत होती. मी मागे-पुढे पाहिले
तेव्हा कळले, की महेंद्रसिंह
धोनी बासरी वाजवित आहे. धोनी बासरी इतक्या सफाईदार पद्धतीने वाजवू शकतो, हे मी पहिल्यांदा अनुभवले होते. दहा मिनिटे आम्ही सर्व जण धोनीतील हे ‘हिडन टॅलेंट’ अनुभवत होतो. धोनी अचानक थांबला आणि आमच्याकडे पाहून हसला. त्याच वेळी आणखी एक आश्चर्य पुढे आले, की संगीताची ती धून धोनीच्या बासरीतून नव्हे, तर विमानतळावरील म्युझिक सिस्टीममधून बाहेर येत
होती. खरे तर धोनी केवळ आवाज काढण्याची शक्कल लढवित होता. आता आम्ही तिसऱ्या टी-२० साठी सज्ज झालो आहोत. मैदानावर विजयी धून वाजविणे सुरूच ठेवू, अशी मला आशा आहे. (टीसीएम)‘