धोनी होणार संघमालक, IPL मध्ये संघ विकत घेण्यास इच्छूक ?
By Admin | Updated: November 10, 2015 12:26 IST2015-11-10T12:26:44+5:302015-11-10T12:26:57+5:30
भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आता आयपीएलमधील संघ विकत घेण्यास इच्छूक आहे. चेन्नई सुपर किंग्जवर निलंबनाची कारवाई झाल्यावर धोनीने आता थेट संघमालक होण्याची तयारी सुरु केली आहे.

धोनी होणार संघमालक, IPL मध्ये संघ विकत घेण्यास इच्छूक ?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आता आयपीएलमधील संघ विकत घेण्यास इच्छूक आहे. चेन्नई सुपर किंग्जवर निलंबनाची कारवाई झाल्यावर धोनीने आता थेट संघमालक होण्याची तयारी सुरु केली आहे.
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणात राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलमधून बाद करण्यात आले आहे. आता आयपीएलमध्ये दोन नवीन संघ येणार असून यासाठी नऊ शहरांचा पर्याय बीसीसीआयने दिला आहे. यात अहमदाबाद, कानपूर, इंदौर या शहरांचा समावेश आहे. एका संघासाठी ४० कोटी रुपये बेस प्राईज ठेवण्यात आली आहे. महेंद्रसिंह धोनीने नवीन संघ विकत घेण्यास इच्छूक असल्याचे बीसीसीआयला कऴवल्याचे वृत्त आहे. धोनीशिवाय कोलकाता येथील उद्योजक संजीव गोएंका यांनीदेखील संघ विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे.