ब्रिस्बेन कसोटीत धोनीला विश्रांती, सुरेश रैनाचे कसोटी संघात पुनरागमन

By Admin | Updated: November 10, 2014 16:02 IST2014-11-10T16:02:29+5:302014-11-10T16:02:29+5:30

महेंद्रसिंह धोनीला दुखापतीने ग्रासल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. तर सुरेश रैनाचे दोन वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन.

Dhoni returns to Brisbane Test, Suresh Raina returns to Test squad | ब्रिस्बेन कसोटीत धोनीला विश्रांती, सुरेश रैनाचे कसोटी संघात पुनरागमन

ब्रिस्बेन कसोटीत धोनीला विश्रांती, सुरेश रैनाचे कसोटी संघात पुनरागमन

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १० -  ऑस्ट्रेलिया दौ-यातील कसोटी मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून महेंद्रसिंह धोनीला दुखापतीने ग्रासल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून सुरेश रैनाने तब्बल दोन वर्षांनी भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केले आहे. तर के. एल. राहुल आणि कर्ण सर्मा या नवीन चेह-यांना ऑस्ट्रेलियाचे तिकीट मिळाले आहे. 
भारतीय संघ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौ-यावर असून आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. या दौ-यात भारतीय संघ चार कसोटी सामने खेळणार आहे. तसेच भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड अशी तिंरगी मालिकाही रंगणार आहे. या दौ-यासाठी भारतीय संघाची सोमवारी निवड करण्यात आली आहे.  दुखापतीतून सावरलेल्या रोहित शर्मालाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. तर स्टुअर्ट बिन्नीला भारतीय संघातून डच्चू मिळाले आहे. महेंद्रसिंह धोनी पहिला कसोटी सामना वगळता उर्वरित दौ-यासाठी उपलब्ध होऊ शकेल असा अंदाज आहे. वश्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये शिखर धवनला विश्रांती देण्यात आली असून त्याऐवजी रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे. 
 
कसोटी संघ - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, रिद्धीमन शहा, नमन ओझा (विकेटकिपर), आर. अश्विन, कर्ण शर्मा, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वरुण अ‍ॅरोन

 

Web Title: Dhoni returns to Brisbane Test, Suresh Raina returns to Test squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.