धोनी चॅम्पियनसारखा खेळला - विराट कोहली

By Admin | Updated: April 22, 2017 23:08 IST2017-04-22T23:08:50+5:302017-04-22T23:08:50+5:30

धोनीला ग्रेट फिनिशर म्हटले जाते. त्यानुसार धोनीने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून पुण्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Dhoni played like a champion - Virat Kohli | धोनी चॅम्पियनसारखा खेळला - विराट कोहली

धोनी चॅम्पियनसारखा खेळला - विराट कोहली

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 22 - आयपीएलचा दहावा हंगाम सुरु झाल्यापासून सातत्याने एमएस धोनीला लक्ष्य करणारे पुणे सुपर जायंटस संघाचे मालक हर्ष गोएंका यांनी आज मात्र धोनीचे कौतुक केले आहे. धोनीने आज सर्वोत्तम खेळ केला. त्याला फॉर्ममध्ये परतल्याचे पाहून आनंद झाला. त्याच्यासारखा ग्रेट फिनिशर नाही अशी स्तुतीसुमने हर्ष गोएंका यांनी धोनीवर उधळली आहेत. 
हैदराबाद सनरायझर्स विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात धोनीच्या नाबाद 61 धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे पुण्याला विजय मिळवता आला. धोनीला ग्रेट फिनिशर म्हटले जाते. त्यानुसार धोनीने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून पुण्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 
धोनीचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला होता. पण धोनीने आज सर्व टीकाकारांना उत्तर दिले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही धोनीचे कौतुक केले. धोनी चॅम्पियन्स सारखा खेळ केला. त्याचा खेळ आनंद देणारा होता असे टिवट विराटने केले आहे.