‘सरप्राईज’ निकालाची धोनीला संधी
By Admin | Updated: July 9, 2014 01:52 IST2014-07-09T01:52:19+5:302014-07-09T01:52:19+5:30
मंगळवारच्या दुपारी ट्रेंटब्रिज क्रिकेट मैदानावर महेंद्रसिंग धोनीशी भेट झाली. भारतीय कर्णधाराचा चेहरा आनंदी वाटत होता.

‘सरप्राईज’ निकालाची धोनीला संधी
नॉटिंघम : मंगळवारच्या दुपारी ट्रेंटब्रिज क्रिकेट मैदानावर महेंद्रसिंग धोनीशी भेट झाली. भारतीय कर्णधाराचा चेहरा आनंदी वाटत होता. पहिल्या कसोटी सामन्याला सामोरे जाण्यापूर्वी धोनी अगदी जॉली मुडमध्ये दिसला. सोमवारीच संघाने माहीचा वाढदिवस साजरा केला. केक कापण्याचाही कार्यक्रम झाला. विराट, रोहित आणि रवींद्र जडेजा यांनी या केकने माहीच्या चेह:याची चांगलीच मसाज केल्याने कुणाला हा केक खाता आला नव्हता.
संघात संचारलेला हा उत्साह नेट प्रॅक्टिमध्येही ओसंडून वाहत होता. विजयासाठी मेहनत घेण्याची वृत्ती खेळाडूंच्या सरावात दिसली. सात वर्षापूर्वीचा प्रसंग मला आठवला. 2क्क्7 ला धोनी पहिल्यांदा इंग्लिश दौ:यावर आला होता. या दौ:यात त्याच्यासह अनेकांनी खास कामगिरी केली. लॉर्डस्वरील पहिल्या कसोटीत त्याने अखेरचा फलंदाज एस. श्रीसंतला सोबत घेऊन मॅचविनिंग अर्धशतकी खेळी केली होती. तेव्हापासून धोनी आणि टीम इंडियाचे भाग्यच फळफळले. यानंतर भारतीय संघाने इंग्लंडची त्रेधा उडविली. ट्रेंटब्रिज कसोटी जिंकून मालिका खिशात घातली. अखेरची कसोटी सुरू होण्याआधीच द. आफ्रिकेत आयोजित टी-2क् विश्वचषकासाठी धोनीची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती. उर्वरित इतिहास क्रिकेट चाहत्यांना ठाऊक असेलच. तेव्हापासून धोनी अँड कंपनीने प्रत्येक महत्त्वाची स्पर्धा जिंकली आहे.
पण तरीही क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. धोनीबाबतही हे घडले. अलीकडे अनेक जय-पराजयाचे चढउतार आले; पण तरही नेतृत्व जोपासून ठेवण्यात धोनी यशस्वी ठरला. आताच्या संघात तो एकमेव दीर्घानुभवी खेळाडू आहे. केवळ ईशांत आणि रोहित शर्मा यांचा अपवाद वगळता इंग्लंडमध्ये कसोटी खेळण्याचा अनुभव कुणालाही नाही. अर्थात भारतीय संघाचा धसका स्वत: प्रतिस्पर्धी कर्णधार अॅलिस्टर कूक याने घेतलेला दिसतो. घरच्या खेळपट्टय़ांवर यशस्वी होऊ किंवा नाही याबद्दल कूकला शंका वाटते. त्यामुळेच आश्चर्यकारक निकाल देण्याची संधी धोनी अँड कंपनीला असेल.
धोनी म्हणतो, ‘मी जेव्हा आक्रमक असतो तेव्हा सहज फलंदाजीच्या तुलनेत अधिक चांगला खेळतो. पहिल्या चेंडूपासूनच धाव काढण्यासाठी तुटून पडतो. मी नेहमी आपल्या सहजप्रवृत्तीला चिकटून राहात आलो आहे. आक्रमक स्ट्रोक्स खेळूनच मी माझी ताकद सिद्ध करु शकतो.’