ब्रँड व्हॅल्यूत धोनी पाचव्या स्थानी
By Admin | Updated: October 10, 2014 04:29 IST2014-10-10T04:29:38+5:302014-10-10T04:29:38+5:30
जगातील सर्वांत धनाड्य ब्रँड अॅथलेटिक्समध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा एकमेव खेळाडू आहे.

ब्रँड व्हॅल्यूत धोनी पाचव्या स्थानी
न्यूयॉर्क : जगातील सर्वांत धनाड्य ब्रँड अॅथलेटिक्समध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा एकमेव खेळाडू आहे. एका व्यावसायिक मॅगॅझिनने केलेल्या सर्वेक्षणात अमेरिकन बास्केटबॉलपटू लेबॉर्न जेम्स हा अव्वल स्थानावर विराजमान असून, त्यापाठोपाठ गोल्फपटू टायगर वुड्स, टेनिस स्टार रॉजर फेडरर व राफेल नदाल यांचा क्रमांक येतो. या यादीत २० मिलियन अमेरिकन डॉलर इतक्या किमतीचे ब्रँड धोनीकडे असून, तो यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
अव्वल दहा महागड्या अॅथलिट्समध्ये जेम्स ३७ मिलियन अमेरिकन डॉलरसह अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. नाईक, मॅकडॉनल्ड्स, कोका कोला, अपर डेक या कंपन्यांशी करार करून या एनबीए स्टारने जवळपास ५३ मिलियन अमेरिकन डॉलरची वार्षिक कमाई केली आहे. वुड्सने २०१४ मध्ये ३६ मिलियन अमेरिकन डॉलरची कमाई करीत दुसरे, तर ३२ मिलियन अमेरिकन डॉलरसह फेडररने तिसरे स्थान पटकावले आहे. या यादीत जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट सहाव्या, पोर्तुगाल आणि रिआल माद्रिदचा स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो सातव्या, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी नवव्या आणि नदाल दहाव्या स्थानावर आहे.