चेन्नईच्या विजयाचे श्रेय धोनीला : रैना

By Admin | Updated: May 6, 2015 02:40 IST2015-05-05T20:21:18+5:302015-05-06T02:40:34+5:30

यंदाच्या सत्रातही चेन्नई सुपर किंग्स शानदार प्रदर्शन करीत आहे. या यशाचे श्रेय चेन्नई सुपर किंग्स स्टार फलंदाज सुरेश रैना याने कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. रैना म्हणाला, मी गेल्या आठ वर्षांपासून चेन्नई संघासोबत आहे आणि हे सर्व सकारात्मक राहिल्यामुळेच शक्य झाले आहे. धोनीने संघाचे जबरदस्त नेतृत्व केले आहे. तुम्हाला लक्षातही असेल की, आम्ही १३०-१४० धावा असतानाही सामने जिंकलेले आहेत. त्याने संघाच्या क्षेत्ररक्षणाचेही कौतुक केले. क्षेत्ररक्षण चांगले असेल तर फलंदाजांना खूप अडचणी निर्माण होतात. आम्हाला चांगल्या क्षेत्ररक्षणाचाही फायदा झाला आहे.

Dhoni credits Chennai win: Raina | चेन्नईच्या विजयाचे श्रेय धोनीला : रैना

चेन्नईच्या विजयाचे श्रेय धोनीला : रैना

चेन्नई : यंदाच्या सत्रातही चेन्नई सुपर किंग्स शानदार प्रदर्शन करीत आहे. या यशाचे श्रेय चेन्नई सुपर किंग्स स्टार फलंदाज सुरेश रैना याने कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. रैना म्हणाला, मी गेल्या आठ वर्षांपासून चेन्नई संघासोबत आहे आणि हे सर्व सकारात्मक राहिल्यामुळेच शक्य झाले आहे. धोनीने संघाचे जबरदस्त नेतृत्व केले आहे. तुम्हाला लक्षातही असेल की, आम्ही १३०-१४० धावा असतानाही सामने जिंकलेले आहेत. त्याने संघाच्या क्षेत्ररक्षणाचेही कौतुक केले. क्षेत्ररक्षण चांगले असेल तर फलंदाजांना खूप अडचणी निर्माण होतात. आम्हाला चांगल्या क्षेत्ररक्षणाचाही फायदा झाला आहे.
दरम्यान, दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यामध्ये सुरेश रैनाने२५६ धावा करीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Dhoni credits Chennai win: Raina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.