बर्मिघम : महेंद्रसिंह धोनीने इंग्लंडविरुद्ध मंगळवारी चौथ्या वन-डेमध्ये 9 गडी राखून शानदार विजय मिळविताना भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. धोनी वन-डे क्रिकेटमध्ये भारताचा ‘नंबर वन’ कर्णधार बनला आहे. धोनीने तिस:या लढतीत सरशी साधत अझहरच्या विक्रमाची बरोबरी साधली होती. आज त्याने अझहरचा विक्रम मोडला.