उद्घाटनाला धोनी, विराट मुकणार?
By Admin | Updated: October 10, 2014 05:10 IST2014-10-10T04:42:36+5:302014-10-10T05:10:06+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि उपकर्णधार विराट कोहली या दोघांचीही इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) अनुक्रमे चेन्नई आणि गोवा संघात भागीदारी आहे

उद्घाटनाला धोनी, विराट मुकणार?
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि उपकर्णधार विराट कोहली या दोघांचीही इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) अनुक्रमे चेन्नई आणि गोवा संघात भागीदारी आहे; परंतु ‘आयएसएल’च्या उद्घाटन संभारंभाला या दोन्ही खेळाडूंना मुकावे लागणार आहे.
भारताची सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे मालिका सुरू असल्याने धोनी व विराट यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावण्यासाठी या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआय परवानगी देईल, असा विश्वास ‘अॅटलेटिको दि कोलकाता संघा’चे सहमालक उत्सुव पारेख यांनी व्यक्त केला.
भारताचा दुसरा वन-डे सामना ११ आॅक्टोबरला दिल्लीत होणार आहे. दरम्यान, या उद्घाटन सोहळ्याला अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलमान खान, जॉन अब्राहम, रणबीर कपूर, वरूण धवन हे बॉलिवूड स्टार, तर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कोलकाता प्रिन्स सौरव गांगुली या क्रिकेटपटूंची उपस्थिती नक्की झाली आहे.