दुखापतग्रस्त विजयच्या स्थानी धवनची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 03:11 IST2017-07-18T03:11:12+5:302017-07-18T03:11:12+5:30

सलामीवीर फलंदाज मुरली विजय मनगटाच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे २६ जुलैपासून प्रारंभ होत असलेल्या

Dhawan's selection in place of injuries | दुखापतग्रस्त विजयच्या स्थानी धवनची निवड

दुखापतग्रस्त विजयच्या स्थानी धवनची निवड

नवी दिल्ली : सलामीवीर फलंदाज मुरली विजय मनगटाच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे २६ जुलैपासून प्रारंभ होत असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याच्या स्थानी शिखर धवनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयचे काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले की,‘अखिल भारतीय निवड समितीने सोमवारी शिखर धवनची दुखापग्रस्त मुरली विजयच्या स्थानी संघात निवड करण्यात आली. भारतीय संघ श्रीलंकेत तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.’
चौधरी यांनी पुढे म्हटले की, ‘आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान मनगटाला झालेल्या दुखापतीतून विजय अद्याप सावरलेला नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला पुनर्वसन प्रक्रिया कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.’
भारतीय वन-डे संघाचा नियमित सदस्य असलेल्या धवनने २३ कसोटी सामन्यांत ३८.५२ च्या सरासरीने धावा फटकावल्या आहे. त्याने अखेरचा कसोटी सामना २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

Web Title: Dhawan's selection in place of injuries