धनराज पिल्ले यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

By Admin | Updated: July 5, 2016 20:21 IST2016-07-05T20:21:48+5:302016-07-05T20:21:48+5:30

भारताचे महान हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांच्या आजारपणासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री जितेंद्र सिंग आणि भारतीय रेल्वेचे भारतीय हॉकी संघाचा माजी

Dhanraj Pillay thanked the Prime Minister for his contribution | धनराज पिल्ले यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

धनराज पिल्ले यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ५ : भारताचे महान हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांच्या आजारपणासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री जितेंद्र सिंग आणि भारतीय रेल्वेचे भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्ले याने आभार मानले.
याविषयी पिल्ले यांनी सांगितले की, ह्यह्यशाहिद भाई यांच्या आजारपणासाठी तत्काळ आर्थिक मदत केल्याबद्दल पंतप्रधान मोदी, क्रीडामंत्री जितेंद्र सिंग, भारतीय रेल्वे आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे आभार मानतो. याआधी पिल्ले यांनी पंतप्रधानांसह अन्य मंत्री आणि पक्षांना यकृत व मूत्रपिंडच्या आजाराशी झुंजत असलेल्या हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांच्या आजारपणासाठी मदत करण्याबाबत आवाहन केले होते.
पिल्ले यांच्या आवाहनानंतर तत्काळ प्रतिक्रीया देताना रेल्वेमंत्र्यांनी शाहिद यांच्या उपचारासाठी लागलेल्या सर्व खर्चाची जबाबदारी घेतली. तर क्रीडा मंत्रालयाने इतर खर्चांसाठी १० लाख रुपये देण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही शाहिद यांच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Dhanraj Pillay thanked the Prime Minister for his contribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.