धन्या नायर-मोहिता सहदेव पराभूत

By Admin | Updated: March 31, 2015 23:48 IST2015-03-31T23:48:18+5:302015-03-31T23:48:18+5:30

भारताचा धन्या नायर व मोहिता सहदेव महिला जोडीला मलेशियन ओपन सीरिज स्पर्धेच्या क्वालिफिकेशन राऊंडमध्येच पराभव पत्करावा लागला.

Dhania Nayar-Mohita Sahdev defeated | धन्या नायर-मोहिता सहदेव पराभूत

धन्या नायर-मोहिता सहदेव पराभूत

मलेशिया : भारताचा धन्या नायर व मोहिता सहदेव महिला जोडीला मलेशियन ओपन सीरिज स्पर्धेच्या क्वालिफिकेशन राऊंडमध्येच पराभव पत्करावा लागला.
धन्या नायर-मोहिता सहदेव जोडीला इंडोनेशियाच्या गेब्बे रिस्तीयाना इमावान व तियरा रोसालिया नुऱ्याधा जोडीने १४-२१, १३-२१ असे नमविले. महिला एकेरीत भारताची स्टार खेळाडू अव्वल मानांकित सायना नेहवाल बुधवारी इंडोनेशियाच्या मारिया फेबेविरुद्ध आपले अभियान सुरू करेल. दुसरीकडे भारताची अव्वल महिला दुहेरी जोडी ज्वाला गुट्टा व अश्विनी पी. इंडोनेशियाच्या देवी टीका व केश्यर्नुवीता हानाडिया या जोडीविरुद्ध पहिली लढत खेळतील. (वृत्तसंस्था)

Web Title: Dhania Nayar-Mohita Sahdev defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.