धनंजय डिसिल्वाचा श्रीलंका संघात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 01:24 IST2017-07-24T01:24:43+5:302017-07-24T01:24:43+5:30

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्ध २६ जुलैपासून प्रारंभ होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी दुखापग्रस्त कर्णधार दिनेश चंदीमलच्या

Dhananjay D'Silva in Sri Lanka squad | धनंजय डिसिल्वाचा श्रीलंका संघात समावेश

धनंजय डिसिल्वाचा श्रीलंका संघात समावेश

कोलंबो : श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्ध २६ जुलैपासून प्रारंभ होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी दुखापग्रस्त कर्णधार दिनेश चंदीमलच्या स्थानी अष्टपैलू धनंजय डिसिल्वाचा समावेश केला आहे. १५ सदस्यांचा समावेश असलेल्या श्रीलंका संघाचे नेतृत्व रंगना हेराथ करणार आहे.
दुखापतीमुळे चंदीमल पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. श्रीलंकेने फिरकीपटू मालिंदा पुष्पकुमार व वेगवान गोलंदाज नुवान प्रदीप यांना संघात स्थान दिले आहे.
संघ : रंगना हेराथ (कर्णधार), उपुल थरंगा, दिमुथ करुणारत्ने, कुसाल मेंडिस, अँजेलो मॅथ्युज, असेला गुणरत्ने, निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्वा, धनुष्का गुणतिलक, दिलरुवान परेरा, सुरंगा लखमल, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, मालिंदा पुष्पकुमार आणि नुवान प्रदीप. (वृत्तसंस्था)

Web Title: Dhananjay D'Silva in Sri Lanka squad