देवगिरी, विवेकानंद उपांत्य फेरीत
By Admin | Updated: August 26, 2014 23:28 IST2014-08-26T23:28:44+5:302014-08-26T23:28:44+5:30
जिल्हा अजिंक्यपद बास्केटबॉल : पोद्दार, गेम चेंजर्स बॉईजही सेमीफायनलमध्ये

देवगिरी, विवेकानंद उपांत्य फेरीत
ज ल्हा अजिंक्यपद बास्केटबॉल : पोद्दार, गेम चेंजर्स बॉईजही सेमीफायनलमध्ये औरंगाबाद : जिल्हा अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत देवगिरी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्याल, पोद्दार इंटरनॅशनल आणि गेम चेंजर्स बॉईज या संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करीत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला़ स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत देवगिरीने बीबीसी संघावर २८-२६ अशी मात करीत उपांत्य फेरी गाठली़ दुसर्या उपांत्यपुर्व सामन्यात पोद्दार इंटरनॅशनलने एमएसएमवर ३३-३२ असा निसटता विजय मिळळविला़ तिसर्या उपांत्यपुर्व फेरीत गेम चेंजर्स बॉईजने स्वाभिमान क्रीडा मंडळाचा ४८-१६ असा पराभव केला़ चौथ्या आणि अखेरच्या लढतीत विवेकानंद महाविद्यालयाने टेंडर केअर होमवर २०-२ अशी सरशी साधुन सेमीफायनलमध्ये प्रवेश केला़ (क्रीडा प्रतिनिधी)