विकासचा ‘स्टार’ थ्रो
By Admin | Updated: October 1, 2014 02:03 IST2014-10-01T02:03:02+5:302014-10-01T02:03:02+5:30
अव्वल थाळीफेकपटू विकास गौडाच्या रौप्यपदकासह भारताने 17 व्या आशियाई स्पर्धेत मंगळवारी चार पदकांची कमाई केली.

विकासचा ‘स्टार’ थ्रो
>इंचियोन : अव्वल थाळीफेकपटू विकास गौडाच्या रौप्यपदकासह भारताने 17 व्या आशियाई स्पर्धेत मंगळवारी चार पदकांची कमाई केली. भारताची वर्षा गौतम आणि एश्वर्या नेदुनचेङिायान जोडीने 12 पैकी एक शर्यतीत बाद होऊन सुध्दा टू पर्सन डिंगी सेलिंग स्पर्धेत कांस्यपदकावर आपला हक्क प्रस्तपित केला. ृ
विकास गौडा आज भारतातर्फे सवरेत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला. एल. सरिता देवी (6क् किलो) व पूजा राणी (75 किलो) यांना उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. वर्षा गौतम व ऐश्वर्या नेदुनचेङिायान यांनी सेलिंगमध्ये कांस्यपदकाची कमाई केली.
भारतीय पुरुष हॉकी संघाने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा 1-क् ने पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली. बॉक्सिंगमध्ये पाचवेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणारी भारतीय महिला बॉक्सर एम.सी. मेरीकोमने (51 किलो) अंतिम फेरीत धडक मारताना किमान रौप्यपदक निश्चित केले. टिन्टू ल्युकाने 8क्क् मीटर दौड स्पर्धेत फायनलसाठी पात्रता मिळविली. आज चार पदकांची कमाई करणा:या भारताने 6 सुवर्ण, 8 रौप्य व 31 कांस्यपदकांसह एकूण 45 पदकांची कमाई करीत पदकतालिकेत 1क् वे स्थान कायम राखले. चीन (254 पदके) अव्वल स्थानी कायम असून, त्यानंतर यजमान दक्षिण कोरिया (162 पदके) व जपान (141 पदके) यांचा क्रमांक आहे.
विकास आज भारताचा स्टार ठरला. विकासने 62.58 मीटर थाळी फेक करीत रौप्यपदक पटकाविले. गौडाचा अपवाद वगळता अॅथ्लेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंना आज छाप सोडता आली नाही.
सरिताच्या वादग्रस्त लढतीपूर्वी भारताची पदकाची दावेदार मेरीकोमने व्हिएतनामच्या लर थी बँगचा 3-क् ने धुव्वा उडवीत अंतिम फेरीत धडक मारली. मेरीकोमला आता कझाखस्तानच्या ङौना शेखरबेकोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. शेखरबेकोव्हाने उपांत्य फेरीत मंगोलियाच्या एन. मेगमारदुलमचा 3-क् ने पराभव केला. बॉक्सिंगमध्ये पुरुष विभागातही भारताला आश्चर्यकारक निर्णयाला सामोरे जावे लागले. देवेंद्रोने उपांत्यपूर्व फेरीत स्थानिक खेळाडू शिन जोघुनविरुद्ध सर्व तिन्ही फे:यांमध्ये आऊंट पंच केल्यानंतरही त्याला पराभव स्वीकारावा लागला.
व्हॉलिबॉलमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. पाचव्या ते आठव्या स्थानाच्या उपांत्य फेरीच्या प्ले ऑफ लढतीत भारताला कझाखस्तानविरुद्ध 3-क् ने पराभव स्वीकारावा लागला. भारताला आता सातव्या-आठव्या स्थानासाठी प्ले ऑफमध्ये खेळावे लागणार आहे.
सुवर्णपदकाचा बचाव करण्याच्या निर्धाराने येथे दाखल झालेल्या भारतीय महिला कबड्डी संघाने दक्षिण कोरियाचा 45-26 ने पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसमध्ये अचंता शरत कमल व अॅन्थोनी अमलराज या अव्वल भारतीय जोडीने पुरुष दुहेरीच्या तिस:या फेरीत प्रवेश केला. (वृत्तसंस्था)
मेरीकोमने कामगिरीत सातत्य राखताना अंतिम फेरीत प्रवेश केला. पूजा राणी (75 किलो) हिला उपांत्य फेरीत चीनच्या ली कियानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. बॉक्सिंगमध्ये आजचा दिवस निराशाजनक ठरला. सरिता देवीने वर्चस्व गाजविले असले तरी तिला उपांत्य फेरीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
सेलिंगमध्ये आज भारतासाठी चांगली वार्ता आहे. वर्षा गौतम व ऐश्वर्या नेदुनचेङिायान यांनी 12 रेसपैकी एकमध्ये अपात्र ठरल्यानंतरही महिला टू पर्सन डिंगी सेलिंग स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.