शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

बांगलादेशाचा विजयाचा निर्धार

By admin | Updated: March 4, 2015 23:54 IST

विश्वकप स्पर्धेत बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी बांगलादेश संघाला गुरवारी ‘अ’ गटाच्या लढतीत स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळविणे आवश्यक आहे.

नेल्सन : विश्वकप स्पर्धेत बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी बांगलादेश संघाला गुरवारी ‘अ’ गटाच्या लढतीत स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळविणे आवश्यक आहे. स्पर्धेत तिन्ही सामने गमावणाऱ्या स्कॉटलंड संघाविरुद्ध विजय मिळविला, तर बांगलादेश संघाला बाद फेरी गाठण्यासाठी केवळ एका विजयाची गरज असेल. बांगलादेश संघाला बाद फेरी गाठण्यासाठी उर्वरित तीनपैकी दोन सामन्यांत विजय मिळविणे आवश्यक आहे. बांगलादेश संघाला यानंतर इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. चारपैकी तीन सामने गमावणारा इंग्लंड संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता, स्कॉटलंड संघ या स्पर्धेत विजयाचे खाते उघडण्यास उत्सुक आहे. वेगवान गोलंदाजी स्कॉटलंड संघाची मजबूत बाजू आहे. अफगाणिस्तानविरुद्ध अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत स्कॉटलंड संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. बुधवारी स्कॉटलंड संघाकडे विजयाची सर्वोत्तम संधी आहे. यानंतर त्यांना माजी चॅम्पियन श्रीलंका व आॅस्ट्रेलिया संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बांगलादेश संघाची नजर बाद फेरी गाठण्यावर केंद्रित झाली असली, तर स्कॉटलंड संघ बांगलादेशाचा मार्ग खडतर करण्याच्या निर्धाराने बुधवारी मैदानात उतरेल. स्कॉटलंडचा कर्णधार प्रेस्टन मोमसेन म्हणाला, ‘‘या लढतीत विजय मिळविण्याची आशा आहे. असोसिएट संघ असलेल्या स्कॉटलंडला पूर्णकालीन सदस्य असलेल्या बांगलादेश संघाविरुद्ध विजय मिळविण्याची ही चांगली संघी आहे. आम्ही या लढतीसाठी सज्ज आहोत. बागंलादेश संघाची भिस्त फिरकीपटूंच्या कामगिरीवर अवलंबून राहील.’’ आयर्लंडने या मैदानावर विंडीजविरुद्ध मिळविलेल्या विजयापासून प्रेरणा घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मोमसेन म्हणाला. बांगलादेशचा कर्णधार मशर्रफ मुर्तजा म्हणाला, ‘‘श्रीलंकेविरुद्ध ९२ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पुन्हा आत्मविश्वास मिळविण्यासाठी बुधवारी खेळल्या जाणारी लढत उपयुक्त ठरले. आम्हाला या लढतीत विजयाची आशा आहे. (वृत्तसंस्था)हेड टू हेडबांगलादेश व स्कॉटलंड यांच्यात एकदिवसीय स्पर्धेत ३ लढती झाल्या आहेत. या तिन्ही लढती बांगलादेशने जिंकल्या आहेत.वर्ल्डकपमध्ये या दोन्ही संघांमध्ये एकच सामना झाला असून यामध्ये बांगलादेशने स्कॉटलंडचा पराभव केला.बांगलादेश : मशरफे मोर्ताझा (कर्णधार), अल आमीन हुसेन, अनामुल हक, अराफत सन्नी, महमुदुल्लाह, मोमिनुल हक, मुशफिकर रहिम (यष्टीरक्षक), नासीर हुसेन, रुबेल हुसेन, सब्बीर रहमान, शकिब अल हसन, सौम्या सरकार, तैजुल इस्लाम, तमीम इकबाल, तस्कीन अहमद.स्कॉटलंड : प्रेस्टन मोम्मसेन (कर्णधार), कायले कोएत्झर (उपकर्णधार), रिची बेरींग्टन, फ्रेडी कोलमन, मॅथ्यूज क्रॉस (यष्टीरक्षक), जोश डॅवेय, अलास्डेर एवान्स, हामिश गार्डीनेर, माजीद हक, मिचल लीस्क, मॅट मॅचान, कॅलूम मॅकलीओड, साफयान शरिफ, रॉब टेलर, लेन वार्डलॉ.