आॅस्ट्रेलियाचा अंतिम फेरी गाठण्याचा निर्धार

By Admin | Updated: January 23, 2015 01:08 IST2015-01-23T01:08:06+5:302015-01-23T01:08:06+5:30

कर्णधार जॉर्ज बेलीसह तीन प्रमुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीतही आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

Determination to reach the final of Australia | आॅस्ट्रेलियाचा अंतिम फेरी गाठण्याचा निर्धार

आॅस्ट्रेलियाचा अंतिम फेरी गाठण्याचा निर्धार

होबर्ट : कर्णधार जॉर्ज बेलीसह तीन प्रमुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीतही आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. तिंरगी मालिकेत इंग्लडविरुद्ध शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत यजमान आॅस्ट्रेलिया संघ अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. पहिल्या दोन्ही लढतीत विजय मिळविणारा यजमान संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आॅस्ट्रेलिया संघाला शुक्रवारच्या लढतीत कर्णधार जॉर्ज बेलीची उणीव भासणार आहे. भारताविरुद्धच्या लढतीत संथ षटकगतीसाठी बेलीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मॅच फिटनेसच्या कारणास्तव शेन वॉटसन व डेव्हिड वॉर्नर यांना विश्रांती देण्यात आलेली आहे.
इंग्लंडला पहिल्या लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता, पण त्यानंतर त्यांनी भारताविरुद्ध दुसऱ्या सामन्यात बोनस गुणासह विजय मिळविला. आॅस्ट्रेलियाने आणखी एक विजय मिळविला तर १ फेब्रुवारी रोजी पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीसाठी त्यांचे स्थान पक्के होईल. प्रभारी कर्णधार स्टिव्हन स्मिथ कसोटी मालिकेतील शानदार फॉर्म वन-डे मालिकेतही कायम राखण्यास उत्सुक आहे. भारताविरुद्धच्या लढतीत इंग्लंड संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून यजमान संघातील नियमित खेळाडूंच्या अनुपस्थिचा लाभ घेण्यास इंग्लंड संघ प्रयत्नशील आहे. आॅस्ट्रेलियाने वॉर्नरच्या स्थानी शॉन मार्शचा तर वॉटसनच्या स्थानी कॅमरुन व्हाईटचा समावेश केला आहे.

Web Title: Determination to reach the final of Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.