शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

भारताचा विजयी आघाडीचा निर्धार

By admin | Updated: June 30, 2017 01:04 IST

आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या वन डेत आज शुक्रवारी कमकुवत वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा धूळ

अँटिग्वॉ : आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या वन डेत आज शुक्रवारी कमकुवत वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा धूळ चारून २-० ने विजयी आघाडी घेण्याच्या निर्धारासह मैदानात उतरणार आहे. सर विव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी ६.३० पासून खेळला जाईल. पोर्ट आॅफ स्पेनचा दुसरा सामना भारताने १०५ धावांनी जिंकला तर पहिला सामना ३९ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे रद्द करावा लागला होता. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्या तीन आघाडीच्या फलंदाजांनी दमदार फटकेबाजी केल्यानंतर गोलंदाजांनी देखील अचूक मारा करीत वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय मिळवून दिला होता. भारताने ५ बाद ३१० धावा उभारल्या पण त्यात धोनी आणि युवराजचे योगदान नव्हते. तिसऱ्या सामन्यात या दोघांकडून धावांची अपेक्षा असेल. युवा अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि केदार जाधव यांच्या उपस्थितीमुळे फलंदाजी आणखी भक्कम मानली जाते. आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विन हा देखील चांगली फलंदाजी करू शकतो. गोलंदाजीचा भार भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांच्या खांद्यावर असून फिरकीची जबाबदारी अश्विनसोबत कुलदीप यादव सांभाळणार आहे. (वृत्तसंस्था)संघ यातून निवडणार-भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराजसिंग, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, रविचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, उमेश यादव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, महंमद शमी, रिषभ पंत.वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), सुनील एम्ब्रिस, देवेंद्र बीशू, रोस्टन चेज, मिगुएल कमिन्स, केली होप, शाय होप, अल्जारी जोसेफ, एव्हिन लुईस, जेसन महंमद, अ‍ॅश्ले नर्स, किरोन पॉवेल, रोवमॅन पॉवेल.स्थळ : सर विव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, अँटिग्वॉसामन्याची वेळ : सायं. ६.३० वा.