राजकीय अस्थिरता असूनही न्यूझीलंड संघ झिम्बाब्वेत
By Admin | Updated: July 22, 2016 05:33 IST2016-07-22T05:33:03+5:302016-07-22T05:33:03+5:30
झिम्बाब्वेत सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेनंतरही न्यूझीलंड संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी येथे दाखल झाला.

राजकीय अस्थिरता असूनही न्यूझीलंड संघ झिम्बाब्वेत
हरारे : झिम्बाब्वेत सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेनंतरही न्यूझीलंड संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी येथे दाखल झाला.
कर्णधार केन विलियमन्सच्या नेतृत्वात न्यूझीलंडचा १५ सदस्यांचा संघ बुधवारी हरारेत पोहोचला असून, आज शुक्रवारी तीन दिवसांचा सराव सामना सुरू होत आहे. पहिली कसोटी २८ जुलैपासून आणि दुसरी कसोटी ६ आॅगस्टपासून खेळली जाईल. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स मैदानावर दोन्ही सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. मागच्या वर्षी न्यूझीलंड संघ झिम्बाब्वेत वन डे मालिकेसाठी येऊन गेला. ढासळलेली अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी या प्रश्नांवरून देशात सध्या सरकारविरोधात नागरिकांनी एल्गार पुकारला आहे. झिम्बाब्वेतील राजकीय स्थिती अस्थिर असल्यामुळेच दौऱ्यावर येण्यापूर्वी न्यूझीलंड संघ व्यवस्थापन आणि बोर्डाकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावादेखील घेण्यात आला होता. (वृत्तसंस्था)