देबोराहने तैवान चषकात रचला इतिहास

By Admin | Updated: October 8, 2015 04:16 IST2015-10-08T04:16:37+5:302015-10-08T04:16:37+5:30

भारतीय सायकलपटू देबोराहने तैवान चषकात आतंरराष्ट्रीय क्लासिक स्पर्धेत एका सुवर्णपदकासह ५ पदके जिंकून इतिहास रचला आहे. २० वर्षांच्या या सायकलपटूनने महिला एलिट

Deoborah created history in Taiwan | देबोराहने तैवान चषकात रचला इतिहास

देबोराहने तैवान चषकात रचला इतिहास

नवी दिल्ली : भारतीय सायकलपटू देबोराहने तैवान चषकात आतंरराष्ट्रीय क्लासिक स्पर्धेत एका सुवर्णपदकासह ५ पदके जिंकून इतिहास रचला आहे. २० वर्षांच्या या सायकलपटूनने महिला एलिट वर्गात सुवर्णपदक प्राप्त केले. हा विक्रम करणारी ती पहिली महिला सायकलपटू आहे. तिने एक सुवर्ण, तीन रौप्य व एक कांस्य पदक मिळविले. महिला एलिट स्प्रिंटमध्ये सुवर्ण जिंकणारी देबोराहने मलेशियाच्या अव्वल स्थानावर असलेल्या सायकलपटूला मागे टाकले. तर, कोरियन स्पर्धेत या भारतीय खेळाडूचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. फोटो फिनिशमध्ये देबोराहला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
देबोराह आता ९ ते ११ आॅक्टोबरदरम्यान बँकॉक येथे होणाऱ्या यूसीआय क्लास वन स्पर्धेत, नवी दिल्लीत १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या ट्रॅक एशिया चषक व जपानमध्ये जानेवारीत होणाऱ्या
अंतिम अठवड्यात होणाऱ्या
आशियाई ट्रॅक सायकलिंग चषकात भाग घेईल.

Web Title: Deoborah created history in Taiwan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.