रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची मागणी
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
नवी मुंबई : नवी मुंबईच्या रेल्वे प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे अद्याप योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यानुसार या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची तसेच प्रकल्पग्रस्तांना गुणवत्तेनुसार रेल्वेत नोकरीची संधी देण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबईच्या रेल्वे प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे अद्याप योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यानुसार या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची तसेच प्रकल्पग्रस्तांना गुणवत्तेनुसार रेल्वेत नोकरीची संधी देण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.मुंबई उपनगर रेल्वे सेवेचा विस्तार झाल्यानंतर मानखुर्द ते पनवेल व ठाणे ते नेरूळ हा नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला. मात्र नवी मुंबईत हा रेल्वे प्रकल्प उभारत असताना त्या ठिकाणच्या अनेक शेतकर्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्यानुसार प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांसाठी काही योजनाही राबवल्या. परंतु त्याचा लाभ अत्यल्प प्रकल्पग्रस्तांना झाला असल्याचे शिवसेना शहर प्रमुख सुरेश म्हात्रे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अद्यापही रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. त्यांना गुणवत्तेनुसार रेल्वेमध्ये नोकरी मिळावी, अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोकण रेल्वेने त्यांच्या प्रकल्पात बाधित झालेल्यांचे पुनर्वसन केलेले आहे. याच धर्तीवर मध्य रेल्वेनेही नवी मुंबईच्या रेल्वे प्रकल्पग्रस्तांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, अशी म्हात्रे यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला अनुसरून यासंबंधीचा अहवाल मागवून घेतला जाईल, असे उत्तरही रेल्वेमंत्री प्रभू यांच्याकडून म्हात्रे यांना प्राप्त झाले आहे.(प्रतिनिधी)