बंदी रद्द करण्याची केसीएची मागणी

By Admin | Updated: July 27, 2015 00:03 IST2015-07-27T00:03:02+5:302015-07-27T00:03:02+5:30

वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवरील बंदीची शिक्षा रद्द करण्यासाठी केरळ क्रिकेट संघटना (केसीए) प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पत्र लिहून बीसीसीआयला

The demand of KCA to ban the ban | बंदी रद्द करण्याची केसीएची मागणी

बंदी रद्द करण्याची केसीएची मागणी

कोची : वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवरील बंदीची शिक्षा रद्द करण्यासाठी केरळ क्रिकेट संघटना (केसीए) प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पत्र लिहून बीसीसीआयला विनंती करण्याचा निर्णय आज केसीएने घेतला आहे. आयपीएलच्या
सहाव्या पर्वातील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्लीतील
एका न्यायालयाने श्रीसंत निर्दोष असल्याचा निर्णय दिला. केसीएचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष टीसी मॅथ्यू बीसीसीआयला पत्र लिहिणार आहेत.
केसीएचे सचिव टीएन अनंतनारायणन म्हणाले, ‘आम्ही बीसीसीआयकडे बंदीची शिक्षा रद्द करण्यासाठी अपील करणार आहोत. आम्ही लवकरच बीसीसीआयला पत्र लिहिणार आहोत, कारण न्यायालयाने स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंत निर्दोष असल्याचा निर्णय दिला आहे. केसीएच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शनिवारी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तीन क्रिकेटपटू श्रीसंत, अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांच्यावरील बंदीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.
दरम्यान दिल्लीतील एका न्यायालयाने स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले. त्यानंतर श्रीसंत दिल्लीहून स्वगृही परतल्यानंतर त्याचे चाहते, मित्र व नातेवाईकांनी कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचे भावनिक स्वागत केले.
श्रीसंत म्हणाला, ‘जीवन आणि कारकीर्द पुन्हा एकदा प्रारंभ करण्याची संधी मिळणार असल्यामुळे आनंद झाला. मी आजपासून सरावाला सुरुवात करणार आहे.’ बीसीसीआयतर्फे क्रिकेट खेळण्यावर असलेली बंदीची शिक्षा रद्द होईल, अशी आशा असल्याचे श्रीसंत म्हणाला.(वृत्तसंस्था)

Web Title: The demand of KCA to ban the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.