मुंबईचा पराभव करत दिल्लीची विजयाची हॅट्ट्रीक

By Admin | Updated: April 23, 2016 19:48 IST2016-04-23T19:48:31+5:302016-04-23T19:48:31+5:30

शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सने 10 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला

Delhi's win over Delhi's hat-trick | मुंबईचा पराभव करत दिल्लीची विजयाची हॅट्ट्रीक

मुंबईचा पराभव करत दिल्लीची विजयाची हॅट्ट्रीक

>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २३ - शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सने 10 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला. मुंबई इंडियन्सचा पराभव केल्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सने विजयाची हॅट्ट्रीक साधली आहे. रोहीत शर्माने 65 धावा करुनही मुंबईला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दिल्ली डेअरडेव्हिल्सने 4 विकेट्स गमावत 164 धावा केल्या होत्या.  
 
मुंबई इंडियन्सने स्फोटक फलंदाजी करत सुरुवात केल्याने मुंबई इंडियन्स हा सामना जिंकेल असं वाटत होतं. मात्र दिल्ली डेअरडेव्हिल्सने केलेल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहीत शर्माने सर्वात जास्त 65 धावा केल्या. कृणाल पांड्यांने जोरदार फटके लगावत 17 चेंडूत 36 धावा केल्या. रोहीत शर्मा खेळपट्टीवर टिकून होता पण दुस-या बाजूला विकेट्स पडत असल्याने मोठी पार्टनर्शिप करता आली नाही. 
 
दिल्लीकडून अमित मिश्राने 2 तर झहीर आणि ख्रिस मॉरीसने प्रत्येकी एक विकेट घेतली. सलामी लढतीत कोलकाताविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या दिल्लीने दमदार पुनरागमन करीत पंजाब व बंगळुरू संघांचा पराभव केला. आणि आता मुंबईचा पराभव केल्याने सलग तीन सामने जिंकले आहेत. 
 

Web Title: Delhi's win over Delhi's hat-trick